''एमआयटीएम''चे कार्य उल्लेखनीय

''एमआयटीएम''चे कार्य उल्लेखनीय

swt318.jpg
92643
सुकळवाडः जयवंती बाबू फाऊंडेशन संचलित मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट सुकळवाडचा वार्षिक पदवीदान समारंभात विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.

‘एमआयटीएम’चे कार्य उल्लेखनीय
परशुराम गंगावणेः वार्षिक पदवीदान समारंभ उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ३१ : एमआयटीएम इंजिनियरिंग कॉलेजचे कार्य उल्लेखनीय आहे, असे प्रतिपादन पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी सुकळवाड येथे केले.
जयवंती बाबू फाऊंडेशन संचलित मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मँनेजमेंट सुकळवाड या सिंधुदुर्गातील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयाचा वार्षिक पदवीदान सोहळा पद्मश्री गंगावणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या समारंभामध्ये १२३ विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाची बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगची पदवी प्रदान करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष संतोष पाल यांची मेहनत उल्लेखनीय असल्याचे सांगून कॉलेजच्या भविष्यातील वाटचालीस त्यांनी शुभेच्छा देत विद्यार्थ्यांनाही मार्गदर्शन केले.
यावेळी उद्योजक रविराज कुलाल, मेरीटाईम बोर्डऑफिसर संदीप भुजबळ, संतोष पाल, डॉ. पी. ए. हुबळी, डॉ. एस. एल.भोळे, प्राचार्य एस. सी. नवले, प्रा. पूनम कदम, प्रा. विशाल कुशे, राकेश पाल, प्रा. तुषार मालपेकर, प्रा. मनोज खाडिलकर, प्रा. संजय कुरसे, प्रा. मयुरी दिवाण, प्रा. काजल सुतार आदी उपस्थित होते.
गंगावणे म्हणाले, शिकण्याचे सातत्य सोडू नका. पैसा आपल्याकडे आपोआप येईल. तुम्ही फक्त आयुष्यात चांगले काम करा. प्राचार्य नवले यांनी सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करीत इंजिनिअरिंग क्षेत्र किती महत्वाचे आहे, हे पटवून दिले. प्राचार्य भोळे म्हणाले, चांगले गुण मिळवून सगळेच यशस्वी झालेत. पण, तुम्ही तुमच्याजवळ असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा.
माजी प्राचार्य हुबळी यांनी निसर्ग हाच आपला खरा शिक्षक आहे. त्याला ओळखा आयुष्यातील पहिले यश म्हणजे पदवी असल्याचे सांगून या यशाबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. मेरीटाईम बोर्ड अधिकारी संदीप भुजबळ यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
संस्थेचे अध्यक्ष पाल यांनी सर्वप्रथम यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि कॉलेजचे प्राचार्य यांचे कौतुक केले. ग्रामीण भागात असलेल्या आणि कोणतीही फारशी प्रवास सुविधा नसलेल्या ठिकाणी एक कॉलेज गेली दहा वर्षे उभे राहते आणि त्या कॉलेजचे विद्यार्थी नॅशनल लेव्हलपर्यत पोहचतात, मोठी बाब आहे, असे सांगून त्यांनी कॉलेजचा विद्यार्थी अभिषेक सिंगचे विशेष कौतुक केले. त्याने सायबर क्राईमवर लिहिलेल्या पुस्तकाचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते राजभवनावर प्रकाशन करण्यात आले. यावेळी राज्यपालांकडून त्याचा विशेष सन्मान करण्यात आला. ही आपल्या कॉलेजसाठी अभिमानास्पद बाब आहे. सूत्रसंचालन प्रा. आफरिन शेख आणि प्रा. ऑश्ले फर्नांडिस यांनी केले तर प्रा. विशाल कुशे यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com