विलवडे विद्यालय माजी विद्यार्थी संघटना अध्यक्षपदी रुपेश परब

विलवडे विद्यालय माजी विद्यार्थी संघटना अध्यक्षपदी रुपेश परब

विलवडे विद्यालय माजी विद्यार्थी
संघटना अध्यक्षपदी रुपेश परब
सावंतवाडी, ता. ३१ ः विलवडे येथील राजा शिवाजी विद्यालयाच्या विलवडे पंचक्रोशी माजी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी रुपेश परब यांची निवड झाली. मुंबई-दादरमधील शारदाश्रम विद्यामंदिर येथे झालेल्या या हायस्कूलच्या विलवडे पंचक्रोशी माजी विद्यार्थी संघटनेच्या बैठकीत या नवनिर्वाचित कार्यकारणीची एकमताने निवड करण्यात आली.
संघटनेची नवनिर्वाचित कार्यकारणी अशी ः अध्यक्ष - रुपेश परब (भालावल), सेक्रेटरी - अंजली सावंत-दळवी (विलवडे), खजिनदार - सुभाष परब (विलवडे), उपाध्यक्ष - परेश धर्णे (विलवडे), सहसचिव - संजय गावडे (सरमळे), कार्यकारणी सदस्य राजेश तांबे (विलवडे), लक्ष्मीकांत सावंत (विलवडे), जयश्री दळवी-सुपल (विलवडे), जनार्दन गावडे (भालावल), सचिन चंदकांत सावंत (मिरेखण - डेगवे), सत्यवान राणे - कोनस्कर (कोनशी), प्रभाकर दळवी (विलवडे), जिवन दळवी (विलवडे), किरण दळवी (विलवडे), सल्लागार- सुर्यकांत दळवी, गोपाळ दळवी. राजा शिवाजी विद्यालयाची माजी विद्यार्थी संघटना पंचक्रोशी गेल्या ५ वर्षांपासून हायस्कूलमध्ये शैक्षणिक सोयी व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत आहे. या हायस्कूलमध्ये तांबोळी, कोनशी, भालावल, सरमळे, विलवडे, वाफोली गावातील विद्यार्थी शिक्षण घेत असून या विद्यार्थ्यांच्या प्रवासासाठी या संघटनेतर्फे गेल्यावर्षी वाहन देण्यात आले. नुकताच हायस्कूलमधील कार्यालयीन कामकाजासाठी लॅपटॉप देण्यात आला. त्यामुळे या शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी यापुढेही संघटना विविध उपक्रम राबविणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष परब यांनी सांगितले. लवकरच स्थानिक पातळीवर विभाग संघटक प्रमुख म्हणून पदाधिकारी जाहीर करण्यात येणार असल्याचे नवनिर्वाचित सेक्रेटरी सावंत-दळवी यांनी सांगितले. या बैठकीला मुंबई परिसरातील सुर्यकांत दळवी, गोपाळ दळवी, हेमंत सावंत, देऊ दळवी, धोंडी दळवी, रोहीदास दळवी, राजन कानडे, सचिन परब, समिर गावडे, पौर्णिमा दळवी-प्रभु, कृष्णकला दळवी, रश्मी (वृंदा) देसाई आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com