रत्नागिरी-संक्षिप्त

रत्नागिरी-संक्षिप्त

सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगासाठी अर्ज करा
रत्नागिरी ः केंद्र शासनाने आत्मनिर्भर भारत मोहिमेंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेस मान्यता दिली आहे. केंद्र शासन सहाय्यित प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना जिल्ह्यात राबवण्यात येत आहे. कृषी विभागांतर्गत विविध पिकांचे क्षेत्र, उत्पादकता व गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांनी चांगले उत्पादन घेऊनही मागणीअभावी त्यांचा माल कमी किंमतीला विकला जातो. अनेक वेळेस फळपिके व भाजीपाला पिकांसारखा नाशवंत शेतीमाल विक्रीअभावी वाया जात असल्याने शेतकर्‍यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. केंद्रशासन सहाय्यित प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग ही केंद्र पुरस्कृत योजना 2020-21 ते 2024-25 या पाच वर्षांच्या कालावधीत राबवली जात आहे. लाभार्थ्यांना सामायिक पायाभूत सुविधा, मूल्य साखळी या घटकातंर्गत बँक कर्जाशी निगडित ग्राह्य प्रकल्प किंमतीच्या 35 टक्के कमाल 3 कोटी रुपयांपर्यंत अर्थसाहाय्य देण्यात येणार आहे तसेच पात्र संस्थांसाठी किमान अनुभव व आर्थिक उलाढाल याची अट नाही. तथापि, प्रकल्पासाठी बँकेची कर्ज पूर्व सहमती आवश्यक आहे. योजनेच्या अधिक माहितीसाठी कृषी अधीक्षक कार्यालयाकडे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.

फोटो ओळी
-rat31p17.jpg ःKOP23L92652 पावस ः रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड आणि बिर्जेवाडी जोडणाऱ्या खारभूमी बंधाऱ्यावर जाणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था.

पूर्णगड-बिर्जेवाडी रस्त्याची दुरवस्था
पावस ः रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड-बिर्जेवाडी खारभूमी बंधाऱ्यावरील रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून रस्त्याचे नूतनीकरण करावे, अशी मागणी करण्यात येत आहे. या भागातील गावडेआंबेरे, मावळंगे, जांभूळआड, बिर्जेवाडी आदी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खारे पाणी थांबवण्याकरिता खारभूमी खात्याने बंधारा बांधला आहे. या बंदराची झडपे नुकतीच दुरुस्त करण्यात आल्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात जाणारे खारे पाणी थांबले आहे. बंधाराच्या मजबुतीकरणाकरिता सिमेंट काँक्रिटचा रस्ता तयार करण्यात आला; मात्र पूर्णगड गावातून बंधाऱ्यावर जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात डांबरीकरण केल्याने रस्ता खराब झाल्यामुळे वाहने नेण्यास अडचणीचे ठरत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com