गुढीपाडवा उलटूनदेखील आनंदाच्या शिधाची प्रतीक्षा

गुढीपाडवा उलटूनदेखील आनंदाच्या शिधाची प्रतीक्षा

३० हजार लाभार्थ्यांना आनंदाच्या शिधाची प्रतीक्षा

खेड, ता. ३१ ः शासनाकडून शिधापत्रिकाधारकांना रास्त धान्य दुकानांच्या माध्यमातून आनंदाचा शिधा देण्याचे जाहीर केले होते; मात्र सणाची गुढी उतरून सात दिवसांचा कालावधी लोटला तरी अद्याप तालुक्यातील ३० हजाराहून अधिक लाभार्थ्यांच्या झोळीत आनंदाचा शिधा पडलेला नाही. त्यामुळे शिधापत्रिकाधारकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
पाच महिन्यांपूर्वी दिवाळी पॅकेज देऊन शिधापत्रिकाधारकांना आनंद दिला होता. यावर्षी देखील गुढीपाडवा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपर्यंतच्या सणासुदीला शिधापत्रिका धारकांसाठी आनंदाचा शिधा जाहीर केला आहे. गतवर्षी खेड शहरासह ग्रामीण भागात ३० हजार ६७६ शिधापत्रिका धारकांना १०० रुपयांमध्ये रवा, चणाडाळ, पामतेल व साखर असा प्रत्येकी एक किलोचा शिधा जिन्नस दिवाळी पॅकेज स्वरूपात वाटप झाला होता. खेड तालुक्यात १२७ रास्त धान्यदुकाने कार्यरत असून शहरातील ५ व ग्रामीण भागातील ११२ दुकानांतून या लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना यंदाचा आनंदाचा शिधा मिळणार आहे. यामध्ये अंत्योदयचे ३ हजार ६२५ तर प्राधान्य कुटुंबाचे २७ हजार ५१ लाभार्थी आहेत; मात्र ऐन गुढीपाडवापूर्वीच कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने त्याचा परिणाम आनंदाचा शिधा वाटपावरदेखील परिणाम झाला; मात्र संप मिटून आठवडाभराचा कालावधी लोटूनदेखील अद्याप आनंद देणारा शिधा लाभार्थांच्या झोळीत पडलेला नाही. त्यामुळे तालुक्यातील बहुसंख्य शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा मिळेपर्यंत एप्रिलचा पंधरवडा उजाडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com