दापोली मतदारसंघात सावरकर गौरव यात्रा काढणार

दापोली मतदारसंघात सावरकर गौरव यात्रा काढणार

rat३१३४.txt

बातमी क्र..३४ (पान २ साठी)

दापोली मतदारसंघात सावरकर गौरव यात्रा काढणार

आमदार कदम; स्वातंत्र्यवीरांचा अपमान सहन करणार नाही

दाभोळ, ता. ३१ ः स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा गौरव करण्यासाठी व त्यांचे जीवनकार्य तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी दापोली विधानसभा मतदारसंघातही सावरकर गौरव यात्रेचे आयोजन केल्याची माहिती आमदार योगेश कदम व भाजपचे उत्तर रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी दिली.
सावरकर यांचे जीवनकार्य फार थोर आहे. राहुल गांधी यांनी चुकीची वक्तव्ये करून त्यांचा अपमान केला. त्याचा आम्ही निषेध करतो. राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा सर्वांनीच निषेध करायला हवा. तरीदेखील आदित्य ठाकरे यांनी भारत जोडो यात्रेत त्यांना जाऊन मिठी मारली.
मुख्यमंत्रिपदाच्या लालसेमुळे उद्धव ठाकरे यांनी सावरकरांच्या मुद्द्यांशी काँग्रेसबरोबर तडजोड केली, हे चुकीचे आहे. गौरव यात्रेच्या निमित्ताने दापोली मतदारसंघात सावरकरांचे विचार तळागाळात पोहोचविण्यात येणार आहेत. सर्वधर्माच्या लोकांनी या गौरव यात्रेत सहभागी व्हावे, यामध्ये धार्मिक तेढ निर्माण होऊ नये याची खबरदारी विरोधकांनी घ्यावी. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान यापुढे सहन केला जाणार नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर यापुढे राहुल गांधी बोलणार नाहीत. मात्र, त्यांनी यापूर्वी केलेल्या अपमानाचे काय? त्यांनी सावरकरांचा अपमान केल्यावर उद्धव ठाकरे यांनी आंदोलन का केले नाही?, असा प्रश्न आमदार कदम यांनी उपस्थित केला.
केदार साठे यांनी सावरकरांचे कार्य, त्यांचे विचार लोकांसमोर मांडण्यात येतील. सावरकरांच्या नावाने सुरू असणारे घाणेरडे राजकारण तत्काळ थांबवावे, असे आवाहन केले. पत्रकार परिषदेला भाजपचे तालुकाध्यक्ष मकरंद म्हादलेकर, शिवसेनेचे सुधीर कालेकर, प्रकाश कालेकर, प्रदीप सुर्वे, भगवान घाडगे, नीलेश शेठ, पप्पू रेळेकर, भाजपचे श्रीराम ईदाते यांच्यासह दोन्ही पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
................................

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com