ऱत्नागिरी ः रत्नागिरी एमआयडीसीतील उद्योजकांना मोठा दिलासा

ऱत्नागिरी ः रत्नागिरी एमआयडीसीतील उद्योजकांना मोठा दिलासा

रस्त्याचे क्लिपार्ट वापरावे.

रत्नागिरी एमआयडीसीत रस्त्यांचे डांबरीकरण

मंत्री सामतांकडून १२ कोटींचा निधी ः उद्योजकांना दिलासा, खोदाईमुळे झाली होती दुरवस्था
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३१ ः उद्योगमंत्री उदय सामतं यांनी रत्नागिरीतील औद्योगिक क्षेत्राला मोठा दिलासा दिला आहे. उद्योगांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा भक्कम केल्यास त्याचा विस्तार होऊन रोजगारनिर्मिती होणार होईल हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी रत्नागिरी एमआयडीसीला १२ कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यातून सुमारे २६ किमीअंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण केले जाणार आहेत.
उद्योगमंत्री झाल्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला दिशा देण्याच्यादृष्टीने नियोजन केले आहे. पहिल्या टप्प्यात त्यांनी बंद पडलेले दोन मोठे उद्योग सुरू केले. यातून भारती शिपयार्ड कंपनीच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात ७० लोकांना रोजगार मिळला आहे. हळुहळू त्यामध्ये वाढ होणार आहे. वेरॉन इंडस्ट्रिजदेखील सुरू होणार आहे; परंतु रत्नागिरी एमआयडीसीअंतर्गत रस्त्यांची अवस्था फारशी चांगली नाही. उद्योगमंत्र्यांनी हे हेरल्यानंतर त्यांनी उद्योजकांना जाणवणाऱ्या समस्या सोडवण्यावर भर दिला.
रत्नागिरी एमआयडीसीतील अंतर्गत रस्त्यांसाठी त्यांनी १२ कोटीचा निधी दिली आहे. यातून तब्बल २६ किमीचे अंतर्गत रस्ते केले जाणार आहेत. येत्या आठ दिवसांत या कामांना सुरवात होत आहे. शहराला लागून असणाऱ्या मिरजोळे, शिरगाव एमआयडीसीत हे रस्ते होणार आहेत. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या विकासकामांचा प्रारंभ होणार आहे. रत्नागिरी असो की, राज्यातील अन्य कोणत्याही औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांना कोणतेही प्रश्न निर्माण होऊ नयेत यासाठी उद्योगमंत्री सातत्याने प्रयत्न करत आहेत. उद्योजकांचे प्रश्न व मागण्या समजावून घेत त्या सोडवण्याला प्राधान्य देत आहेत. उद्योगांना पूरक पायाभूत सुविधा निर्माण केल्यास राज्यातील व जिल्ह्यातील उद्योगांचा विस्तार होऊन येथील तरुणांच्या रोजगार मिळणार आहे.

उद्योजकांच्या मागणीमुळे निधी उपलब्ध
एमआयडीसीतील रस्ते खराब होत आले आहेत. काही ठिकाणी गॅस पाईपलाईन, केबल टाकल्याने रस्त्यांची खोदाई झालेली आहे. त्यामुळे चरही पडले आहेत. वाहनांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यांच्या डांबरीकरणाची मागणी उद्योजकांनी उद्योगमंत्री सामंत यांच्याकडे केली होती. त्यानुसार त्यांनी तातडीने निधी उपलब्ध करून दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com