
अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग; वृद्धास पाच वर्षे सश्रम कारावास
rat३१४२.txt
बातमी क्र.. ४२ (पान ३ साठी)
अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग;
वृद्धास पाच वर्षे सश्रम कारावास
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३१ ः अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रय़त्न करणाऱ्या वृद्धाला येथील विशेष पोक्सो न्यायालयाने पाच वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा व ४ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला. जीवा ऊर्फ रोंग्या गंगाराम जाधव (वय ६६) असे त्याचे नाव आहे. ही घटना १० एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली होती.
याबाबत माहिती अशी ः अल्पवयीन मुलीचे आई-वडील कामासाठी बाहेर गेल्याने ती घरी एकटीच होती. अंगणात वाळत टाकलेल्या कपड्यांना चिमटे लावत असताना आरोपी जीवा जाधवने तिचा हात पकडला. घाबरून मुलगी घरात गेली. मात्र, जीवा तिच्यामागून घरात गेला आणि अतिप्रसंग करण्याचा प्रय़त्न केला. आई-वडील घरी आल्यावर घडला प्रकार पीडितेने सांगितला. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने संगमेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी जीवा जाधवविरुद्ध भादंवि कलम ३५४, ३५४ (अ), लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२चे कलम ७, ८,१२ व ९ (एम) अन्वये गुन्हा दाखल केला होता. तपास पोलिस निरीक्षक उदय झावरे यांनी केला.
तपासात पोलिसांनी संशयितास अटक करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केल होते. आज या खटल्याचा निकाल विशेष पोक्सो न्यायालयात झाला. सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी अभियोक्ता अॅड. अनुपमा ठाकूर यांनी युक्तिवाद केला. या खटल्यात त्यांनी ११ साक्षीदार तपासले. विशेष पोक्सो न्यायाधीश वैजयंतीमाला राऊत यांनी आरोपीला पाच वर्षे सश्रम कारावास व ४ हजार ५०० रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून महिला पोलिस कॉन्स्टेबल अपूर्वा बापट यांनी काम पाहिले.
...........................