रत्नागिरी ः रत्नागिरी, देवरूख, राजापूरमध्ये सावरकर गौरवयात्रा

रत्नागिरी ः रत्नागिरी, देवरूख, राजापूरमध्ये सावरकर गौरवयात्रा

रत्नागिरी, देवरूख, राजापूरमध्ये सावरकर गौरवयात्रा

अॅड. दीपक पटवर्धन ः विविध समाज घटकांचाही सहभाग
रत्नागिरी, ता. ३१ ः भाजप आणि शिवसेनेतर्फे जाहीर करण्यात आलेली सावरकर गौरवयात्रा येत्या ४ ते ६ एप्रिलदरम्यान रत्नागिरी जिल्ह्यात येणार आहे. ४ ला देवरूख, ५ ला राजापूर आणि ६ एप्रिलला रत्नागिरी शहरात मोठ्या दिमाखदार पद्धतीने सावरकर यात्रा काढण्यात येणार आहे, अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष‌ ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिली.
आज आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी यात्रेबाबत माहिती दिली. ते म्हणाले, स्वा. सावरकर यांचे विचार जाज्वल्य होते. त्यांनी रत्नागिरीत असताना समाजक्रांती केली. सातत्याने परखडपणे आपले विचार सावरकरांनी मांडले. त्यामुळे त्यांचे विचार, व्यक्तिमत्व हे जनमानसामध्ये एक आदरणीय असं व्यक्तिमत्व म्हणून लोकमान्य झाले आहे. अशा व्यक्तिमत्वाचा सातत्याने अपमान करण्याचं धोरण हे काँग्रेसने आणि प्रामुख्याने राहुल गांधींनी अमलात आणलं. या त्यांच्या अत्यंत बालिश अशा कृत्याचा विरोध करण्यासाठी वेळोवेळी आंदोलने करण्यात आली.
ॲड. पटवर्धन म्हणाले, ‘भाजपने आता सकारात्मक पद्धतीने स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार हे प्रज्वलित राहावे यासाठी सावरकरांच्या नावाने गौरवयात्रा या संपूर्ण विधानसभा क्षेत्रामध्ये काढण्याचे धोरण आखले आहे. सावरकरांचा गौरव करणारी यात्रा रत्नागिरीमध्ये ४, ५ आणि ६ एप्रिलला रत्नागिरी शहरात निघेल. ६ ला भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिवशी रत्नागिरी शहरामध्ये सावरकर गौरवयात्रा निघेल. ४ ला देवरूख शहरामध्ये आणि ५ ला राजापूर नगरीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांची गौरवयात्रा निघेल. ॲड पटवर्धन म्हणाले, शिवसेनाही या गौरवयात्रेमध्ये सहभागी झालेली असेल. कारण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी मिळून या गौरवयात्रेच्या उपक्रमाची घोषणा केलेली आहे. त्यामुळे आम्ही सर्वजण एकत्र येऊन विविध समाज घटकाला एकत्र येऊन यात्रा यशस्वी करणार आहोत. ज्यांना सावरकरांच्या विचारावर प्रेम आहे, ज्यांच्या मनामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याबद्दल आहे अशा सर्व समाजघटकांना एकत्र करून सावरकरांच्या विचाराचे जागरण व्हावं आणि त्यामुळे अपप्रवृत्तीलाही आळा बसावा, अशा आशयातूनही गौरवयात्रा काढण्यात येणार आहे.

चौकट १
सावरकर स्मारकात अभिवादन
६ ला सकाळी सावरकर यात्रा रत्नागिरीत कारागृहात सावरकर स्मारकात अभिवादन करेल. नंतर यात्रा सावरकर चौक येथे नेण्यात येईल. येथे सभा होऊन सांगता होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com