क्षयरोग निर्मुलन मोहिमेत सहभागी व्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्षयरोग निर्मुलन मोहिमेत सहभागी व्हा
क्षयरोग निर्मुलन मोहिमेत सहभागी व्हा

क्षयरोग निर्मुलन मोहिमेत सहभागी व्हा

sakal_logo
By

92743
माड्याचीवाडी ः प. पु. गावडेकाका महाराज यांनी गरजूंना मदत करत वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा केला. (छायाचित्र ः अजय सावंत)

क्षयरोग निर्मुलन मोहिमेत सहभागी व्हा

गावडेकाका महाराज; माड्याचीवाडीत वाढदिवस उपक्रमांनी

कुडाळ, ता. ३१ ः सिंधुदुर्ग जिल्हा क्षयरोग निर्मलुन होणे काळाची गरज आहे. या मोहिमेत सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे प्रतिपादन श्री श्री १०८ महंत प. पु. गावडेकाका महाराज यांनी आज माडयाचीवाडी येथे कार्यक्रमात केले. प. पु. गावडे काका महाराज यांचा वाढदिवस सामाजिक, आरोग्य, शैक्षणिक उपक्रमाने सामाजिक बांधिलकीने भाविकांच्या उपस्थितीत साजरा केला.
तालुक्यातील माड्याचीवाडी येथील प. पु. गावडे काका महाराजांच्या वाढदिवसानिमित्त श्री सद्गुरु भक्त सेवान्यास माडयाचीवाडी यांच्यातर्फे व सिंधुदुर्गासह महाराष्ट्र, गोवा राज्यातील भक्तजणांतर्फे वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य विषयक उपक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी सिद्धेश किनळेकर, अमित कोरगावकर, गोवा प्रीती कुशे न्यासचे अध्यक्ष एकनाथ गावडे, पंकज कामत, राकेश केसरकर, रमेश घाडीगांवकर, बापू गावकर, विजय साईल आदी उपस्थित होते.
गावडे काका महाराज म्हणाले, ‘‘सिंधुदुर्ग जिल्हा क्षयरोग मुक्त होण्यासाठी सर्वांच्या मदतीची गरज आहे. आज सद्गुरु भक्त सेवा न्यासच्या माध्यमातून ३१ क्षयरोग दत्तक घेतले आहेत. न्यासच्या माध्यमातून त्यांना सेवाभावीवृत्तीने मदत केली जात आहे. आपल्याला क्षयरोग मुक्त मिशन हाती घेऊन यशस्वी करायचे आहे. जीवनाच्या प्रवाहात वाटचाल करताना सद्गुरु हा महत्त्वाचा घटक आहे. यशाकडे वाटचाल करताना जिद्द, चिकाटी, मेहनतीबरोबर आत्मविश्वास, प्रामाणिक याची जोड महत्त्वाची आहे. कोरोना संकटात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. अशांना श्री स्वामी समर्थ न्यासच्या माध्यमातून मदत दिली. दरम्यान, प. पु. गावडेकाका महाराजांच्या वाढदिवसानिमित्त ३१ क्षयरोग रुग्णांना मदत, किटवाटप, वेतोरे येथील मूकबधिर कलाकार पूजा धुरी हिचा सन्मान व आर्थिक मदत तसेच कॅन्सरग्रस्त सरमळकर यांना दहा हजाराची आर्थिक मदत करण्यात आली.