गुजरात अभ्यासदौरा ठरला अविस्मरणीय

गुजरात अभ्यासदौरा ठरला अविस्मरणीय

92797
गुजरात ः अभ्यास दौऱ्यादरम्यान विद्यार्थ्यांनी साबरमती आश्रमास भेट दिली.

गुजरात अभ्यासदौरा ठरला अविस्मरणीय

विद्यार्थ्यांची विविध स्थळांना भेट; लोकजीवन, संस्कृतीचा घेतला अनुभव

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ३१ ः सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षण विभाग व समग्र शिक्षा अभियान अंतर्गत राष्ट्रीय आविष्कार दौऱ्यासाठी गुजरात राज्यात अभ्यास दौऱ्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांचा दौरा अविस्मरणीय ठरला. २४ ते २९ मार्च दरम्यान झालेल्या या अभ्यास दौऱ्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गुणवत्तापूर्ण असलेल्या २० शाळांमधील विद्यार्थ्यांची निवड झाली होती. या विद्यार्थ्यांनी गुजरात राज्यातील विविध पर्यटनस्थळांना भेटी दिल्या.
या अभ्यास दौऱ्यात जगातील सर्वात उंच असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल स्टॅच्यू ऑफ युनिटी, नर्मदा नदीवरील सरदार सरोवर, स्वामीनारायण अक्षरधाम मंदिर, अहमदाबाद येथील सायन्स सिटी, साबरमती आश्रम, नरेंद्र मोदी स्टेडियम, अटल सेतू अशा विविध पर्यटन स्थळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांनी माहिती घेतली. तसेच गुजरात राज्यातील संस्कृती, लोकगीते, खाद्यसंस्कृती, पोशाख व लोकजीवनाचाही अभ्यास विद्यार्थ्यांनी अनुभवला. या अभ्यास दौऱ्यात गुजरातमधील गार्डनना भेट देऊन भुलभुलैय्या व विविध खेळांचा आस्वाद घेतला. ‘फोर-डी’ चित्रपटाचाही आस्वाद विद्यार्थ्यांनी लुटला. अटल सेतू पुलावर विद्यार्थ्यांनी डबल सायकल चालवत ‘सायकल चालवा, पर्यावरण वाचवा’, असा संदेश दिला.
या दौऱ्यात सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शाळेतील संस्कृती गुरव, पार्थ दहिबावकर, रिषभ पाळेकर, सानिका गवस, सूरज नाईक, आदिती रासम, अन्वय शेटये, तपस्या दळवी, सांची पाटेकर, किरण कदम, चैतन्य भोगले, प्रज्ञा मेस्त्री, तनिष्का राणे, अमोघ वालावलकर, शमिका कदम, श्रृती शिंदे, दुर्गेश तावडे, मनाली परब, सार्थक जामदार, मानवी पाटयेकर हे विद्यार्थी सहभागी झाले होते. या विद्यार्थ्यांसोबत कणकवली तालुक्यातील खारेपाटण शाळेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर, सावंतवाडी तालुक्यातील बांदा नं. १ केंद्रशाळेचे शिक्षक जे. डी. पाटील, ओरोस बुद्रुक नं. १ शाळेच्या शिक्षिका संगीता पाटयेकर हे मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांसोबत होते. विद्यार्थी अभ्यास दौऱ्याहून परत सिंधुदुर्गनगरी येथील रेल्वे स्थानकावर परतल्यावर पालक व शिक्षकांनी त्यांचे स्वागत केले.
---
दौऱ्यासाठी प्रशासनाचे सहकार्य
या दौऱ्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांची प्रेरणा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांचे मार्गदर्शन लाभले. अभ्यास दौरा यशस्वी करण्यासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे व समग्र शिक्षा जिल्हा कार्यक्रम अधिकारी स्मिता नलावडे आदींनी परिश्रम घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com