राजन कोरगावकर यांचा कुडाळ बीडीओंतर्फे सत्कार

राजन कोरगावकर यांचा कुडाळ बीडीओंतर्फे सत्कार

92801
कुडाळ ः राजन कोरगावकर यांचे अभिनंदन करताना बीडीओ विजय चव्हाण.

राजन कोरगावकर यांचा
कुडाळ बीडीओंतर्फे सत्कार
कुडाळ, ता. १ ः राजन कोरगावकर यांचा मला सार्थ अभिमान आहे, प्रतिपादन पंचायत समिती प्रशासक तथा गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी केले.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा कुडाळने शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत धरणे आंदोलनाची नोटीस शिक्षण विभागाला दिली होती. त्याची दखल घेऊन गटविकास अधिकारी चव्हाण यांनी समितीच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी निमंत्रित केले होते. शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात चव्हाण यांनी सकारात्मक चर्चा घडवून आणली.
यावेळी शिक्षण विभागाच्यावतीने कुडाळ गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर, शिक्षण विभाग वरिष्ठ सहाय्यक कुणाल तेंडुलकर, गीतेश पिंगुळकर (पीएफएमएस प्रणाली) आदी उपस्थित होते. अलीकडेच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या राज्य महाअधिवेशनात कोरगावकर यांची समितीच्या राज्य महासचिवपदी तसेच राज्य सरकारी कर्मचारी समन्वय संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी निवड झाली. ही अभिमानास्पद बाब असून कोरगावकर यांनी राज्याचे नेतृत्व करावे, अशा शुभेच्छा देत गटविकास अधिकारी चव्हाण यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी समितीचे तालुकाध्यक्ष प्रसाद वारंग, सरचिटणीस महेश कुंभार, ज्येष्ठ मार्गदर्शक चंद्रकांत अणावकर, नंदकुमार राणे, सचिन मदने, संगीता राऊळ, सुजाता जड्ये, लक्ष्मण आगलावे, संजय घाटकर, शैलेंद्र न्हावेलकर उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com