ध्यास डॉ. काशिनाथ घाणेकर यांचे वास्तव दाखवण्याचा

ध्यास डॉ. काशिनाथ घाणेकर यांचे वास्तव दाखवण्याचा

rat१p८.jpg
९२८१३
साखरपाः मी आणि डॉ. काशिनाथ घाणेकर हा एकपात्री प्रयोग सादर करताना रमेश भिडे.
----------
ध्यास डॉ. काशिनाथ घाणेकर यांचे वास्तव दाखवण्याचा
रंगकर्मी रमेश भिडे यांचा प्रयत्न; एकपात्रीतून उलगडला जीवनपट
अमित पंडितः सकाळ वृत्तसेवा
साखरपा, ता. १ः नाट्य कलावंतांना सहकलाकार अनेक असतात; पण ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलाकाराच्या वाट्याला येणारी बदनामी पाहून अस्वस्थ होत त्याची वास्तव बाजू मांडण्याचा प्रयत्न करणारे सहकलाकार विरळाच. अशांपैकीच एक रमेश रामचंद्र भिडे.
भिडे यांचा ११ वर्षे डॉ. घाणेकरांशी संपर्क होता. डॉक्टरांची अनेक नाटके आणि त्यांचे खासगी जीवन पाहिले होते. त्यामुळे डॉक्टरांच्या अभिनय गुणांपेक्षा त्यांच्या व्यसनीपणाच्या आणि अन्य चर्चांनी भिडे अस्वस्थ झाले. त्यातून डॉ. घाणेकर यांची दुसरी आणि वास्तव बाजू लोकांसमोर आली पाहिजे, हा विचार सुरू झाला.
कोरोना काळात भिडे यांनी डॉ. घाणेकर यांच्या काही आठवणी ध्वनीमुद्रित केल्या. तब्बल ७५ ऑडिओ फाइल्स त्यांनी स्वत:च्या आवाजात ध्वनिमुद्रित केल्या. त्या त्यांनी काहीजणांना ऐकवल्यावर हे नाटक रंगभूमीवर आले पाहिजे, अशी आग्रही मागणी अनेकांनी केली. त्यातूनच मी आणि डॉ. काशिनाथ घाणेकर या एकपात्री नाटकाचा जन्म झाला. या नाटकाची लिखित संहिता नसल्याचे भिडे सांगतात. केवळ चार फोटोंच्या नेपथ्यावर ते हा एकपात्री प्रयोग करतात. आजपर्यंत २२ प्रयोग त्यांनी केले आहेत. चिपळूण हे डॉ. घाणेकरांचे जन्मगाव. आजही चिपळूणमध्ये त्यांचे नातेवाईक राहतात; पण चिपळूणच्या प्रयोगाला एकही नातेवाईक न आल्याची खंत भिडे यांनी व्यक्त केली. २२ वा प्रयोग हा रामनवमीच्या निमित्ताने साखरपा इथे श्रीराम देवस्थानच्यावतीने आयोजित केला होता. साखरपा हे डॉ. घाणेकर यांचे मूळ गाव असल्याने या प्रयोगाचे महत्व विशेष होते.
-------------
कोट
डॉ. घाणेकर यांची व्यसनाधीनता मान्यच आहे; पण ते त्याच्याही पलीकडचे असामान्य नट होते. त्यांनी अभिनय करून उंचीवर नेऊन ठेवलेल्या भूमीला नंतर अनेकांनी केल्या; पण ती उंची कोणालाच गाठता आली नाही.
- रमेश भिडे, रंगकर्मी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com