सिंधुदुर्ग शिक्षक पतपेढीचा आलेख चढता

सिंधुदुर्ग शिक्षक पतपेढीचा आलेख चढता

92859
सिंधुदुर्गनगरी ः राज्य सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याबद्दल राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने राजन कोरगावकर यांचा सपत्नीक सत्कार करताना संघटनेचे माजी राज्याध्यक्ष सावळाराम अणावकर. शेजारी उदय शिंदे, सचिन मदने, भाई चव्हाण, जिल्हाध्यक्ष नारायण नाईक आदी.

सिंधुदुर्ग शिक्षक पतपेढीचा आलेख चढता

उदय शिंदे; ओरोसमध्ये ‘कार्यकर्ता चेतना’ मेळावा उत्साहात

ओरोस, ता. १ ः राजन कोरगावकर यांना संघटनात्मक कामाची आवड आहे. त्यामुळे राज्याचे सरचिटणीसपद त्यांना दिले आहे. कोरगावकर यांच्या रुपाने सिंधुदुर्ग जिल्ह्यावर संघटनेने मोठा विश्वास ठेवला आहे. प्राथमिक शिक्षक पतपेढीचा आलेखही चढता आहे. पतपेढी समितीच्या हातात सुरक्षित आहे. जिल्ह्यातील महिला कार्यकर्त्यांमध्ये मोठी ताकद आहे. त्यामुळे सुरेखा कदम यांना राज्याच्या कार्यकारिणीत स्थान दिले जाईल, अशी ग्वाही महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या चेतना मेळाव्यात राज्य नेते उदय शिंदे यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा सिंधुदुर्गतर्फे नूतन राज्य पदाधिकारी, शिक्षक समिती पतपेढी संचालक सन्मान सोहळा, आंतर जिल्हा बदली शिक्षक शुभेच्छा व कार्यकर्ता चेतना मेळावा सिंधुदुर्गनगरी येथील प्राथमिक शिक्षक समितीच्या सभागृहात जिल्हाध्यक्ष नारायण नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर, शिक्षक पतपेढी अध्यक्ष नामदेव जांभवडेकर, ज्येष्ठ मार्गदर्शक चंद्रकांत अणावकर, माजी राज्याध्यक्ष सावळाराम आणावकर, राज्य महिला आघाडीच्या सुरेखा कदम, ज्येष्ठ मार्गदर्शक भाई चव्हाण, जिल्हा महिला आघाडी उपाध्यक्ष नीलम बांदेकर, माजी जिल्हाध्यक्ष नंदकुमार राणे, नितीन कदम, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष निकिता ठाकूर, सचिव वैभवी कसालकर, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रसेन पाताडे, जिल्हा सरचिटणीस सचिन मदने, सातारा संचालक विशाल कणसे, प्रवक्ता सुनील चव्हाण, शरद नारकर आदी उपस्थित होते. यावेळी राज्य नेते उदय शिंदे, नूतन राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर, पतपेढी अध्यक्ष नामदेव जांभवडेकर आदींचा सत्कार करण्यात आला.
पतपेढी अध्यक्ष नामदेव जांभवडेकर यांनी मागील पाच वर्षांत पतपेढीचे भांडवल वाढले असल्याचे स्पष्ट केले. कोणत्याही बँकेचे कर्ज या पतसंस्थेवर नाही, असे सांगत पुढील पॅनेल समितीचेच असेल, अशी आशा व्यक्त केली. महिला जिल्हाध्यक्षा निकिता ठाकूर यांनी संघटनेने शिक्षक म्हणून जगायला शिकवल्याचे सांगून येणाऱ्या निवडणुकीत सक्षम महिलांना उमेदवारी देण्याची मागणी केली. नंदकुमार राणे, भाई चव्हाण, सावळाराम अणावकर, नवनाथ बोराडे आदींनी आपली मनोगते व्यक्त केली. जिल्हा सरचिटणीस सचिन मदने यांनी प्रास्ताविक केले. उत्तम पाटील यांनी सूत्रसंचालन केले. चंद्रसेन पाताडे यांनी आभार मानले.
--
प्रत्येकाने एक तरी कार्यकर्ता घडवा
राज्य सरचिटणीस कोरगावकर म्हणाले की, संघटनावाढीसाठी प्रत्येकाने एक तरी कार्यकर्ता घडविणे आवश्यक आहे, असे आवाहन करतानाच शिक्षक पतसंस्थेवर पुन्हा आपलीच सत्ता येईल, असा विश्र्वास व्यक्त केला. जिल्हाध्यक्ष नारायण नाईक यांनी राजन कोरगावकर हे त्यागाचे मूर्तिमंत उदाहरण असल्याचे सांगितले. पतपेढीचे काम चांगले आहे. भावी संचालकांनी याच मार्गाने जावे. विरोधी सदस्यही पतसंस्थेच्या कामाबाबत चांगलेच बोलतात ही अभिमानाची बाब आहे, असे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com