चिपळूणात विक्रमी कर वसुली

चिपळूणात विक्रमी कर वसुली

चिपळुणात विक्रमी कर वसुली
चिपळूण, ता. १ः जिल्‍ह्यात घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीबाबत चिपळूण पालिका अव्‍वलस्थानी आहे. चालू वर्ष आणि मागील आर्थिक वर्षातील थकित मागणीचा विचार करता एकूण १६ कोटी येणे बाकी आहे. ३१ मार्चअखेरपर्यंत १२ कोटी १० लाख इतका कर वसूल झालेला आहे.
दोन करदाते कोर्टात असल्‍यामुळे त्‍यांची कोर्टातील दाव्‍यातील रक्‍कम वगळता १५ कोटी मागणीपैकी १२ कोटी १० लाख वसूल झाल्‍यामुळे वसुलीची एकूण टक्‍केवारी ही ८० टक्‍के इतकी झालेली आहे. या वसुलीकामी पालिकेचे मुख्‍याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी योग्‍य नियोजन करून अगदी सुरवातीपासूनच वसुली पथक बनवून आणि सर्व माध्‍यमांद्वारे वसुलीची जाहिरात करून नागरिकांना कर भरण्‍यास भाग पाडले. जप्‍तीची कारवाई हा शेवटचा पर्यायही अवलंबला गेला. मार्चमध्ये तर मुख्‍याधिकारी यांनी सर्व अधिकारी राजू खातू, अनंत मोरे, प्रमोद ठसाळे, राजा जाधव, संतोष शिंदे, वैभव निवाते, बापू साडविलकर, वलिद वांगडे यांनी पूर्ण वेळ मेहनत घेऊन करवसुलीचे उद्दिष्‍ट पार केले.
वलिद वांगडे यांनी वसुली अधिकारी आणि नागरी सुविधा केंद्र येथे दिवसरात्र रक्‍कमेच्‍या योग्‍य पावत्‍या वगैरे भरणाचे काम केले. त्यांना रवी सातपुते, मंगेश देवळेकर, दत्‍ताराम लोलम, ऋषिकेश पाथरे यांनी साथ दिली. वसुली टीममधील कर्मचारी मोहन गोलांबडे, सुशील सकपाळ, संतोष शिगवण, प्रवीण नाईक, सतीश गोरिवले, राजन सावंत, उमेश राजेशिर्के, निखिल कांबळे, राम देवळेकर यांनीही कर वसुलीसाठी मेहनत घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com