रत्नागिरी  ः पर्यटन विकासासाठी 37 कोटीचे प्रकल्प

रत्नागिरी ः पर्यटन विकासासाठी 37 कोटीचे प्रकल्प

पर्यटन विकासासाठी ३७ कोटींचे प्रकल्प

छत्रपती शिवराय, संभाजी महाराजांचे भव्य पुतळे, वॉटर फाउंटन प्रस्तावित

रत्नागिरी, ता. १ ः रत्नागिरी शहराचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी नावीन्यपूर्ण योजनेतून ३७ कोटींचे प्रकल्प हाती घेतले आहेत. जिल्ह्याने देशाला ६ भारतरत्न दिले असून, त्यांचे १५ ते १८ फुटाचे चेहरे बनवण्यात येणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराजांचे भव्य उभे पुतळे उभारण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातील पहिले ध्यान केंद्र, तसेच नागपूरच्या धर्तीवर वॉटरफाउंटन म्हणजे पाण्याच्या स्क्रीनवर रत्नागिरीचा इतिहास सांगणारा प्रकल्प उभारला जाणार आहे. सुमारे ३७ कोटींचे हे प्रकल्प रत्नागिरीच्या पर्यटनाला नवा आयाम देतील, अशी माहिती उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकंत्री उदय सामंत यांनी दिली.
येथील सावरकर नाट्यगृहामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत सामंत म्हणाले, ‘‘नावीन्यपूर्ण योजनेतून रत्नागिरीला निधी मिळावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली होती. नावीन्यपूर्ण योजनेतून १२ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. जिल्ह्याने देशाला ६ भारतरत्न दिले आहेत. या ६ रत्नांचे १८ फुटाचे चेहरे बनवण्यासाठी ३ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. जे. जे. आर्ट स्कूलची टीम येऊन त्याची पाहणी करणार आहेत. जिजामाता उद्यान, संसारे उद्यानामधील जागेची पाहणी केली जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या उभ्या पुतळ्यांसाठी दीड कोटी रुपये मंजूर आहेत.
महाराष्ट्रातील पहिले ध्यान केंद्र रत्नागिरीत उभारले जाणार आहे. त्यासाठी ५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. रत्नागिरीत सुमारे १२ कोटींचा विकासनिधी नावीन्यपूर्ण योजनेतून खर्च केला जाणार आहे. पर्यटनामध्ये आणखी भर पडावी यासाठी नागपूरच्या धर्तीवर रत्नागिरीत वॉटरफाउंटन उभारण्यात येणार आहे. यामध्ये पाण्याच्या स्क्रीनवर रत्नागिरीचा इतिहास दाखवला जाणार आहे. यासाठी शासनाने २५ कोटी रुपये मंजूर केले आहेत. जिल्हा नियोजनचा १०० टक्के निधी खर्च झाला आहे. जो काही १७६ रुपये निधी समर्पित झाला आहे. तो तांत्रिक कारणामुळे झाला आहे. गेल्या वर्षी जिल्ह्याचा २७१ कोटींचा विकास आराखडा होता. पुढील वर्षाचा आराखडा ३०० कोटींची मंजूर झाला आहे. शहरातील टिळक स्मारकाचे काम लवकरच सुरू होणार आहे. टिळक ग्रंथालयाचे काम पूर्ण झाले असून, लवकरच उद्‌घाटन केले जाणार आहे. महाराष्ट्रातील पहिले स्किल सेंटर रत्नागिरीसाठी जाहीर झाले आहे. शिवसृष्टी, झूचा प्रस्ताव हे सर्व प्रकल्प आता पाईपलाईनमध्ये आहेत. यातून रत्नागिरी शहराची विकासात्मक आणि पर्यटनदृष्ट्या घोडदौड सुरू आहे, असे सामंत म्हणाले.
०००
कोतवडे, पावसला ३५ कोटी
तालुक्यात कोतवडे आणि पावस या दोन जिल्हा परिषद गटाला ३५ कोटींचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून तेथील पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत. शासन विकासासाठी चांगला निधी देत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
-----------
चौकट-
इलेक्ट्रिक वाहनांचा कारखाना येणार
जिल्ह्यातील एमआयडीसी वाढावी यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. मंडणगड, दापोली अन्य ठिकाणी त्याची चाचपणी चालू आहे. वाटद येथे एमआयडीसीला विरोध झाला असला, तरी तेथील ग्रामस्थांशी मी चर्चा करणार आहे. रत्नागिरीत आता तीन प्रकल्प येत आहेत. यामध्ये मॅंगो पार्क, मरिन पार्क आणि इलेक्ट्रिक वाहनांचा प्रकल्प येऊ घातला आहे. या प्रकल्पांना कसा इन्सेन्टिव्ह द्यायचा याबाबत विचार सुरू आहे; परंतु यातून तीन ते चार हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com