फोंडाघाट मारहाण प्रकरणी चौघांवर पोलिसांत गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फोंडाघाट मारहाण प्रकरणी 
चौघांवर पोलिसांत गुन्हा
फोंडाघाट मारहाण प्रकरणी चौघांवर पोलिसांत गुन्हा

फोंडाघाट मारहाण प्रकरणी चौघांवर पोलिसांत गुन्हा

sakal_logo
By

फोंडाघाट मारहाण प्रकरणी
चौघांवर पोलिसांत गुन्हा
कणकवली,ता.१ ः शिवीगाळ केल्याबाबत विचारले असता त्या रागातून मारहाण केल्याप्रकरणी फोंडाघाट-खैराटवाडी येथील चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. नकलूबाई काळू बोडके, त्यांची मुलगी ताई, संजय वरक व मुलगा बबन काळू बोडके (रा. फोंडाघाट), अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत सुरेखा धाऊ गावडे (रा. फोंडाघाट) यांनी आज दाखल केलेल्या फिर्यादीवरून कणकवली पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला. ही घटना काल (ता.३१) रात्री नऊच्या सुमारास घडली होती.
सुरेखा धाऊ गावडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, वाडीतील खंडू वरक यांच्या लग्नाची वरात चालू होती. या वरातीला मुलगी संगीता गेली होती. तिची तब्येत बरी नसल्याने मी तिला आणण्यासाठी शिवाजी चौक येथे गेली. घरी परत येत असताना ताई वरक हिने माझ्या मुलीला उद्देशून शिवीगाळ केली. तेव्हा मी तिला ‘माझ्या मुलीला शिव्या का देतेस’, असे विचारले असता ताई वरक आणि तिची आई नकलूबाई बोडके यांनी माझ्या मुलीला शिवीगाळ करत मारहाण केली. त्यावेळी नकलूबाई यांचा मुलगा बबन हाही तेथे आला आणि त्यानेही मला व माझ्या मुलीला हाताच्या थापटाने मारले या झटापटीत माझ्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र तोडून नुकसान केले. त्यावेळी माझा मुलगा शुभम हा आम्हाला सोडवण्यासाठी आला असता त्यालाही मारहाण करण्यात आली. तसेच बबन याने रस्त्यावर पडलेला दगड माझ्या पायावर मारून दुखापत केली. दरम्यान, या प्रकरणाचा तपास फोंडाघाट पोलिस करत आहेत.