रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा
रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा

रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा

sakal_logo
By

rat०२१५.txt

बातमी क्र.. १५ (टुडे पान ३ साठी)

फोटो ओळी
93017
रत्नागिरी ः वेतोशी शाळा क्र. २ मध्ये श्रीरंग कलादर्पण फाऊंडेशनने शैक्षणिक साहित्य दिले. विद्यार्थ्यांसमवेत अक्षय शहापूरकर, प्रतीक अथणे, अरुण झोरे, प्रवीण बोटके आदी.
--------------
वेतोशी शाळा क्र. २ ला श्रीरंग फाऊंडेशनतर्फे साहित्य

रत्नागिरी ः जिल्हा परिषदेच्या पूर्ण प्राथमिक शाळा वेतोशी क्र. २ ला पुण्यातील श्रीरंग कलादर्पण फाऊंडेशनने वॉटर प्युरिफायर, वॉटरकुलर, प्रत्येक मुलास दप्तर व इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. संस्थेचे संस्थापक अक्षय शहापूरकर, अध्यक्ष प्रतीक अथणे, संचालक अजित पवार, सड्येचे केंद्रप्रमुख अमर घाडगे, वेतोशीचे सरपंच अरुण झोरे, माजी उपसरपंच रोहित माचिवले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रवीण बोटके यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. ग्रामपंचायत सदस्य दीपेश माचिवले, वृषाली माचिवले, वैदेही बोटके व सर्व पालक, मुख्याध्यापिका मानसी मोने, सहशिक्षक रवींद्र धोपट, संजय जगताप, स्वयंसेवक सोनाली घवाळी आदी यावेळी उपस्थित होते.
......

फोटो ओळी

93035
रत्नागिरी : चिंचखरी, वेसुर्लेमार्गे कोळंबेतील नागेश्वर मंदिरापर्यंत बससेवा सुरू झाली. यावेळी ज्येष्ठ नागरिक नारायण आगाशे, सरपंच प्रशांत पाटील, उपसरपंच रवींद्र भातडे, मनोहर आगाशे, निर्भय आगाशे आदी.
.....
चिंचखरीमार्गे नागेश्वर मंदिरापर्यंत एसटी सेवा

रत्नागिरी : तालुक्यातील कोळंबे येथील नागेश्वर मंदिरपर्यंत चिंचखरी, वेसुर्लेमार्गे एसटी बससेवा सुरू झाली. गावात या मार्गाने प्रथमच एसटी धावल्याने ग्रामस्थांची पायपीट वाचणार असून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. गावात पहिली बस आल्यानंतर कोळंबे गावचे ज्येष्ठ नागरिक नारायण तथा नाना आगाशे यांनी श्रीफळ वाढवून उद्‍घाटन केले. तसेच चालक, वाहकांचे स्वागत केले. यावेळी सरपंच प्रशांत पाटील, उपसरपंच रवींद्र ऊर्फ दादा भातडे, मनोहर आगाशे, निर्भय आगाशे, सुधाकर जोशी, दत्ताराम जोशी, समीर भितळे, प्रवीण शिंदे, अर्चना हातीसकर, समृद्धी भितळे, नाना शिंदे, पराग पाटील व बागवाडी व टेंबवाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते. वेसुर्ले नागेश्वर मंदिर ही गाडी सकाळी ६.००, ८.५०, १०.५, १२.३०, १५.४५, १७.१५, १७.४० आणि २०.०० या वेळेत सोडण्यात येणार आहेत. जास्तीत जास्त प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
............................