बांद्यातील बेदरकार वाहतूक रोखा

बांद्यातील बेदरकार वाहतूक रोखा

93252
बांदा ः उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सिंधुदुर्ग यांना निवेदन सादर करताना फिलिप्स रॉड्रिक्स आदी.

बेदरकार वाहतुकीकडे का दुर्लक्ष?

बांदावासीयांचा प्रश्न; प्रवाशांना धोका, आज इन्सुली नाक्यावर बेमुदत उपोषण

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ३ ः सिंधुदुर्गातून गोवा येथे भरधाव वेगाने ओव्हरलोड खडी व वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असून सुद्धा उपप्रादेशिक परिवहन विभाग सिंधुदुर्गकडून दुर्लक्ष केले जात आहे. सात दिवसांची मुदत देऊनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याने ओव्हरलोड वाहतुकीविरोधात उद्या (ता. ४) सकाळी १०.३० वाजता इन्सुली चेक नाक्यावर बेमुदत उपोषण सुरू करणार असून कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास उपप्रादेशिक परिवहन विभाग सिंधुदुर्ग जबाबदार राहणार असल्याचा इशारा उध्दव ठाकरे शिवसेनेतर्फे इन्सुली मतदारसंघ विभागप्रमुख फिलिप्स रॉड्रिक्स यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सिंधुदुर्ग यांना दिला आहे.
याबाबत दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात रॉड्रिक्स यांनी म्हटले आहे की, इन्सुली चेक नाक्यावरून तसेच नजीकच्या इतर गावांतून खडी व वाळूची राजरोसपणे ओव्हरलोड वाहतूक सुरू असते. काही वेळा दोन ब्रासची रॉयल्टी भरून चार ब्रासची वाहतूक केली जात असल्यामुळे शासनाचा महसूल बुडत असून संबंधित कंपन्या स्वतःच्या तिजोऱ्या भरत असल्याचा आरोप फिलिप्स यांनी केला आहे.
संबंधित अधिकाऱ्यांना हाताशी धरून ओव्हरलोड वाहतूक रात्रंदिवस सुरू असल्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. परिणामी सदर लहान-मोठे अपघातही वाढले आहेत. वाहने भरधाव वेगाने जात असल्याने रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या शाळकरी मुलांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे कारवाई करावी, अशी मागणी यापुर्वी केली होती. मात्र दुर्लक्ष करण्यात आल्याची खंत फिलिप्स रॉड्रिक्स यांनी व्यक्त केली आहे.
--
कारवाईकडे दुर्लक्ष; म्हणून उपोषण
ओव्हरलोड वाहतूक सात दिवसांच्या आत बंद करावी, अशी मागणी रॉड्रिक्स यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सिंधुदुर्ग यांच्याकडे लेखी स्वरुपात केली होती; परंतु अद्यापपर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने शाळकरी विद्यार्थी, नागरिक व प्रवाशांच्या जीवितास धोका आहे. त्यामुळे उद्या (ता. ४) बेमुदत उपोषण छेडणार असल्याचे रॉड्रिक्स यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com