
राहुल गांधींवरील कारवाई हा तर जनतेचा अपमान
rat0432.txt
(पान 2 साठी)
विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न
अशोक जाधव; राहूल गांधींच्या खासदारकी रद्दच्या कारवाईचा निषेध
रत्नागिरी, ता. 4 ः विविध प्रश्नांवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपला बेजार करून सोडले. म्हणून त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली. जिल्हा काँग्रेस याचा जाहीर निषेध करते. निषेध फक्त राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाली म्हणून नाही, देशातील 140 करोड जनतेसाठी लोकशाहीची मूल्य वाचवण्यासाठी आहे, असे ठाम मत सामाजिक न्याय विभाग प्रदेशाध्यक्ष अशोक जाधव यांनी व्यक्त केले.
काँग्रेसभवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, देशभर लोकशाहीची अवहेलना सुरू आहे. खासदार राहूल गांधी हे संसदेत प्रश्न विचारत होते. अदानीला भाजप सरकार का वाचवत आहे? वाढती महागाई, बेरोजगारी यांसारखे प्रश्न उपस्थित करून भाजप सरकारला बेजार केले. केंद्र सरकार खासदार राहुल गांधी यांच्याविरुद्ध सूडबुद्धीने वागत आहे. विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे; परंतु भाजप जेवढा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतो तेवढा विरोधीपक्ष त्यांच्या विरोधात ताकदीने उभा राहील.
या वेळी ओबीसी विभाग प्रदेश उपाध्यक्ष दीपक राऊत, सोशल मीडिया विभाग राज्य समन्वयक विनय खामकर, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष कपिल नागवेकर, महिला जिल्हाध्यक्ष ॲड. अश्विनी आगाशे, दिलीप मोहिते, कैसर देसाई, वासुदेव सुतार, काका तोडणकर, कल्पेश जाधव, तुळसाराम पवार, विश्वनाथ किल्लेदार, दीपक दळवी इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.