हनुमान यागाने जन्मोत्सवाला प्रारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हनुमान यागाने जन्मोत्सवाला प्रारंभ
हनुमान यागाने जन्मोत्सवाला प्रारंभ

हनुमान यागाने जन्मोत्सवाला प्रारंभ

sakal_logo
By

-rat5p9.jpg-
93716
रत्नागिरी ः शहरातील दक्षिणाभिमुख हनुमान मंदिरात जन्मोत्सवाला प्रारंभ झाला. हनुमान यागामध्ये पूर्णाहूती करताना यजमान व पुरोहित पहिल्या छायाचित्रात तर दुसऱ्या छायाचित्रात कीर्तन करताना मकरंदबुवा रामदासी.
-
हनुमान यागाने जन्मोत्सवाला प्रारंभ

रत्नागिरी, ता. 5 ः शहरातील मारूती आळी येथील प्राचीन दक्षिणाभिमुख हनुमान मंदिरामध्ये आजपासून हनुमान जन्मोत्सवाला प्रारंभ झाला. या निमित्त सकाळी पूजा, अभिषेक, लघुरूद्र, हनुमान याग, राजोपचार पूजा झाली. गुरुवारी (ता. 6) सकाळी हनुमान जन्मोत्सव असून, सायंकाळी रथयात्रा मोठ्या उत्साहात निघणार आहे.
मंदिरात जन्मोत्सवानिमित्त आकर्षक रोषणाई, मंडप घालण्यात आला आहे. मंगळवारी (ता. 4) सायंकाळी मकरंदबुवा रामदासी यांचे कीर्तन रंगले. गुरुवारी (ता. 6) सकाळी 6.39 वा. श्रींचा जन्मकाळ, जन्मोत्सवाचे कीर्तन होईल. सायं. 5 वा. श्रींची रथयात्रा हनुमान मंदिर, गोखलेनाका, धनजीनाका, मच्छीमार्केट नाका, राममंदिर, विठ्ठलमंदिर व पुन्हा हनुमान मंदिरात परत येईल. 7 एप्रिलला दुपारी 12 ते 3 या वेळेत महाप्रसाद असून, सायंकाळी 5.30 वा. माणिकमोती महिला मंडळाचे भजन, रात्री 10 ते 12 या वेळेत हभप महेश सरदेसाई लळिताचे कीर्तन सादर करतील. या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मारूती मंदिर संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर भिंगार्डे आणि ज्येष्ठ पदाधिकारी प्रमोद शेरे यांनी केले आहे.