पाचल परिसरामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस

पाचल परिसरामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस

पान ३ साठीमेन

(टीप- या
बातमीशेजारी साखरपा आणि पोफळीची बातमी घ्यावी.)

९४२९४

९४२९५

पाचल पंचक्रोशीत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस
ढगांचा गडगडाट ; आंबा, काजूवर प्रतिकूल परिणाम
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ७ ः तालुक्याच्या पूर्व भागातील पाचल परिसरामध्ये शुक्रवारी (ता. ७) सायंकाळी सोसाट्याच्या वारा आणि ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस पडला. राजापूर शहरासह पश्‍चिम भागामध्ये ढगाळ वातावरण होते. अवकाळी पावसामुळे आंबा आणि काजू पिकावर प्रतिकूल परिणाम होऊन नुकसान होण्याची भीती बागायतदारांकडून वर्तवण्यात येत आहे.
गेले दोन दिवस तालुक्यामध्ये उकाडा वाढला होता. या बदलेल्या वातावरणाने सारेच हैराण झाले होते. या वातावरणामध्ये आजही फारसा काही बदल झालेला नव्हता. अशा स्थितीमध्ये हवामानखात्याकडून जिल्ह्याच्या काही भागामध्ये तुरळक पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. हा अंदाज सायंकाळी खरा ठरला. पाचल पंचक्रोशीत सायंकाळी ४ वा. च्या सुमारास ढगाळ वातावरण निर्माण होऊन अचानक सोसाट्याचा वारा आणि ढगांचा गडगडाट सुरू झाला. सुमारे दहा-पंधरा मिनिटे वारा आणि गडगडाटासह पाऊस कोसळला. या अवकाळी पावसामध्ये सोसाट्याच्या वाऱ्‍यामध्ये आंबा-काजू झाडावरील तयार फळे पडून बागायतदारांचे नुकसान झाले असण्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, दुसऱ्‍या वा तिसऱ्‍या टप्प्यातील झाडांवरील आंबा तोडणीच्या कामांनी सध्या वेग घेतलेला आहे. अशा स्थितीमध्ये ढगाळ वातावरण आणि अवकाळी पडलेल्या पावसाचा शिल्लक असलेल्या आंबा आणि काजूपिकावर प्रतिकूल परिणाम होऊन मोठे नुकसान होण्याची भीती बागायतदार, शेतकऱ्‍यांकडून वर्तवली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com