मोबाईल चोरीस

मोबाईल चोरीस

कणकवली शहरातून
मोबाईल चोरीस
कणकवली, ता. ९ ः शहरातील एका हॉटेलसमोर मोटरसायकलवर ठेवलेला मोबाईल चोरीस गेला आहे. ही चोरी शुक्रवारी (ता. ७) रात्री अकराच्या सुमारास झाली आहे. याबाबत सागर शरद वरवडेकर (वय ३६, रा. बोर्डवे, ता. कणकवली) यांनी येथील पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. यात म्हटले आहे की, शहरातील एका हॉटेलमध्ये जेवायला गेलो असता. आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत होता. यावेळी चुकून मोटरसायकलवर मोबाईल राहिला होता. हॉटेलबाहेर ओळखीचा एक जण दिसल्याने त्याच्याशी बोलत असताना मोटारसायकलवर हा मोबाईल होता. तेवढ्यात संशयितांने मोबाईल लांबविला आहे. याबाबत अनोळखी संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com