
मंडणगड - पक्षाच्या कार्यात सातत्य राखावे
फोटो ओळी
-rat८p६.jpg -KOP23L94377 ः मंडणगड ः प्रमुख मार्गदर्शक भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. प्रभाकर पेंडसे यांना सन्मानित करताना भाजपा तालुकाध्यक्ष विश्वदास लोखंडे व अन्य.
कार्यकर्त्याने पक्षाच्या कार्यात सातत्य राखावे
भाजपा स्थापना दिन ; डॉ. प्रभाकर पेंडसे यांचे आव्हान
मंडणगड, ता. ८ ः राष्ट्रीय अखंडता व भारतीय संस्कृती जोपासली जावी, या उदात्त हेतूने प्रेरित होऊन आपल्या कार्यात सातत्य राखल्यानेच भारतीय जनता पार्टी हा देशातील प्रथम क्रमांकाचा पक्ष म्हणून कार्यरत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कर्तृत्वाची छाप संपूर्ण जगावर पाडण्यात यश मिळवले आहे. याच पक्षाचे काम आपल्याला तालुक्यात वाढवायचे असेल तर प्रत्येक कार्यकर्त्याने सर्वस्व अर्पण करून पक्षाच्या कार्यात सातत्य राखावे, असे आव्हान डॉ. प्रभाकर पेंडसे यांनी केले.
मंडणगड तालुका भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने लोकनेते गोपीनाथजी मुंडे महाविद्यालयातील सभागृहात भारतीय जनता पार्टी स्थापना दिन भाजपा तालुकाध्यक्ष विश्वदास लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या वेळी अशोक गोविलकर, माजी तालुकाध्यक्ष सचिन थोरे, कार्याध्यक्ष लक्ष्मण मोरे उपस्थित होते. कार्यक्रमात ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच बुथ सशक्तीकरण अभियान व सामाजिक न्याय सप्ताह यासारखे कार्यक्रम राबवण्याविषयी माहिती देण्यात आली.