
जिल्ह्यात लवकरच टेक्निकल सेंटर
94702
कणकवली ः येथील एसएसपीएम महाविद्यालयात टेक्नॉलॉजी बिझनेस इनक्युबेशन फाउंडेशन सेंटरचे उद्घाटन करताना केंद्रीय मंत्री नारायण राणे. शेजारी निलम राणे, नितेश राणे आदी.
जिल्ह्यात लवकरच टेक्निकल सेंटर
केंद्रीय मंत्री नारायण राणे; टेक्नॉलॉजी बिझनेस इनक्युबेशन फाऊंडेशन सेंटरचे उदघाटन
कणकवली,ता. ९ ः जिल्ह्यातील तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी ज्या ज्या शिक्षणाची गरज आहे, असे प्रशिक्षण जिल्ह्यात दिले जाईल. त्यासाठी दोनशे कोटी रुपयांचे टेक्निकल सेंटर लवकरच सिंधुदुर्गात सुरू केले जाणार आहे. चांगले प्रशिक्षण घेऊन उच्च प्रतीच्या नोकऱ्या मोठमोठ्या कंपन्यांमध्ये मिळविण्याची क्षमता येथील तरुणांमध्ये निर्माण होईल, अशा पद्धतीचे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच पाचशे एकर क्षेत्रात आधुनिक टेक्नॉलॉजी असलेली मोठी इंडस्ट्रीज जिल्ह्यात आणत आहे, अशी माहिती केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केली.
कोकणातील पहिले शासनमान्य कोकण भूमी टेक्नॉलॉजी बिझनेस इनक्युबेशन फाउंडेशन सेंटरचे उदघाटन येथील एसएसपीएम येथे झाले. यावेळी केंद्रीय मंत्री राणे बोलत होते. एसएसपीएम संस्थेच्या अध्यक्षा निलम राणे, सचिव नितेश राणे, सदस्य प्रगती नरे, कोकण भुमी टेक्नॉलॉजी इनक्युबेशन सेंटरचे डायरेक्टर अभिषेक तेंडुलकर, आसावरी राजोपाध्ये, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिश गांगल, प्रशासकीय अधिकारी शांतेश रावराणे विद्यार्थी उपस्थित होते.
---
३५० भावी उद्योजकांचे प्रस्ताव
केंद्रीयमंत्री श्री.राणे म्हणाले, ‘‘विकासाच्या बाबतीत मी नेहमीच आग्रही आहे. म्हणूनच कणकवलीत दोन वेळा सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून उद्योग प्रशिक्षण आणि प्रदर्शन कार्यक्रम घेतल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ३५० तरुण-तरुणींनी उद्योजक होण्यासाठी प्रस्ताव सादर केले. सकारात्मक दृष्टीने काम केल्यास असे यश आणखीन मिळेल.’’