
254 जीवनावश्यक वस्तूंचे कीट वाटप
-rat१०p३०.jpg ः
९४८८२
लांजा ः मुस्लिम वेल्फेअर सोसायटी लांजा व ओमानकडून सर्वधर्मीय गोरगरीब जनतेला कीट वाटप करण्यात आले.
-
जीवनावश्यक वस्तूंचे कीट वाटप
रमजानचे औचित्य ; मुस्लिम वेल्फेअर सोसायटीचा उपक्रम
लांजा, ता. १० ः गेल्या सहा वर्षांपासून तालुक्यासह जिल्ह्याच्या सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या मुस्लिम वेल्फेअर सोसायटी लांजा व ओमान या संस्थेने रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर सर्व धर्मातील गोरगरीब जनतेला सुमारे २३०० रुपये किमतीच्या २५४ जीवनावश्यक वस्तूंच्या कीटचे वाटप करून खऱ्या अर्थाने आपली सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
हम सबके सब हमारे, हे ब्रीदवाक्य घेऊन मुस्लिम सोसायटी लांजा ही संस्था जातीभेदाच्या भिंती पार करून आपले काम करत आहे. दोन वर्षांच्या कोरोना काळात आणि चिपळुणातील महापुरात संस्थेने शेकडो कुटुंबीयांना ४० ते ५० लाख रुपयांच्या अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले होते.
मुस्लिम वेल्फेअर सोसायटी गेल्या ६ वर्ष सातत्याने रमजान महिन्यात सर्व धर्मातील गोरगरीब लोकांना रमजान कीटचे वाटप करत आहे. कोरोना काळात संस्थेने अशा ३२०० किट्स वाटप केले होते. यावर्षी संस्थेने २५४ किटचे वाटप केले आहेत. या किटमध्ये तांदूळ, गव्हाचे पीठ तसेच डाळी, कडधान्य, खजूर, सरबत बॉटल, फालुदा, साखर, बेसन, चहापावडर, मीठ, मसाला, शेवपुडा, कांदा-बटाटे आधी २७ वस्तूंच्या किटमध्ये समावेश आहे. या किटचे वाटप करताना मुस्लिम वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष रफिक नाईक, कार्याध्यक्ष आकिल नाईक, सल्लागार ताज महंमद मुजावर, महिलाध्यक्षा दिलशाद नाईक, युवा अध्यक्ष अकीब मुजावर तसेच असलम इसफ, अर्श नाईक, दिलशाद नाईक, निक्कत डिंगणकर, रेहान गडकरी, अल्फाइस सारंग, बशीर लांजेकर, नाझिया लांजेकर, फैजान रखांगी, निसार परास आदींसह मुस्लिम वेल्फेअर सोसायटी सलाला ओमानचे सर्व सदस्य यांनी मेहनत घेतली.
-