ःराजापूर अर्बन बॅंकेला सदिच्छा भेट

ःराजापूर अर्बन बॅंकेला सदिच्छा भेट

-rat१३p२३.jpg ः
९५५२६
राजापूर ः चिपळून अर्बन को-ऑप बँक लि. चिपळूणच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करताना राजापूर अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ संचालक जयंत अभ्यंकर.
-
चिपळूण अर्बन बॅंक पदाधिकाऱ्यांची
राजापूर अर्बन बॅंकेला सदिच्छा भेट

राजापूर, ता. १३ ः चिपळूण अर्बन को-ऑप. बँकेचे अध्यक्ष निहार गुढेकर, उपाध्यक्ष नीलेश भुरणे, संचालक रत्नदीप देवळेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष देसाई, विशेष वसुली अधिकारी दिनेश रेडीज यांनी नुकतीच राजापूर अर्बन बँकेला सदिच्छा भेट दिली. या भेटीवेळी बँकेच्या वतीने सर्वांचा सत्कार करण्यात आला आहे.
राजापूर अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे यांनी बँकेच्या सांपत्तिक स्थितीची माहिती दिली. बँकेचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ संचालक जयंत अभ्यंकर यांनी बँकेच्या यशाचे गमक स्पष्ट केले. या वेळी नुकत्याच संपलेल्या २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या सांपत्तिक स्थितीचा आढावा घेताना दोन्ही बॅंकांनी साधलेल्या प्रगतीचा चर्चात्मक संवाद साधण्यात आला. या वेळी नूतन चेअरमन हनिफ काझी, व्हाईस चेअरमन प्रसाद मोहरकर यांचा चिपळूण अर्बन बँकेच्यावतीने सन्मान करण्यात आला. या वेळी राजापूर अर्बन बँकेचे संचालक संजय ओगले, अ‍ॅड. शशिकांत सुतार, दीनानाथ कोळवणकर, अनामिका जाधव, प्रतिभा रेडीज, विवेक गादीकर, राजेंद्र कुशे, अनिलकुमार करंगुटकर, किशोर जाधव, प्रकाश कातकर, बँकेचे अधिकारी प्रसन्न मालपेकर, लक्ष्मण म्हात्रे, रमेश काळे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com