सायबर गुन्ह्यांबाबत
मालवणात जनजागृती

सायबर गुन्ह्यांबाबत मालवणात जनजागृती

95552
सायबर गुन्ह्यांबाबत
मालवणात जनजागृती
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १३ : सिंधुदुर्ग पोलिस दलामार्फत पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलिस निरीक्षक विजय यादव यांच्या संकल्पनेतून येथील ठाण्याच्या वतीने बसस्थानक परिसरात काल (ता. १२) सायबर गुन्हे जनजागृती अभियान राबविण्यात आले.
या अभियानांतर्गत सायबर गुन्ह्याविषयी घडणाऱ्या गुन्ह्यांबाबत अधिकारी व अंमलदार सहायक पोलिस निरीक्षक श्रीमती एस. एस. बंगडे, सुभाष शिवगण, हवालदार सुप्रिया पवार, नाईक वृषा पाटील, नमिता ओरोसकर यांनी सायबर फसवणुकीबाबत पथनाट्य सादर केले. या कार्यक्रमप्रसंगी सायबर मोबाईल व्हॅनद्वारे कार्यक्रमाची शोभा वाढविली. या वेळी पोलिस उपनिरीक्षक नितीन नरळे, सहायक पोलिस उपनिरीक्षक एस. पी. चव्हाण, एस.एस. आंबेरकर, गुरुप्रसाद परब, प्रतिक जाधव यांच्यासह ओरोस सायबर विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. या सायबर गुन्हे जनजागृती अभियानामुळे लोकांच्या ज्ञानात भर पडल्याने लोकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे पोलिस प्रशासनाची प्रतिमा उंचावण्यास मदत झाली आहे. मालवण पोलिस ठाण्याच्या वतीने अशा प्रकारचे जनजागृतीपर कार्यक्रम आगामी काळातही राबविण्यात येणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com