किनळे जयभीम उत्कर्ष मंडळाचे ‘महाधम्मरक्खिता’ पुरस्कार जाहीर

किनळे जयभीम उत्कर्ष मंडळाचे ‘महाधम्मरक्खिता’ पुरस्कार जाहीर

किनळे जयभीम उत्कर्ष मंडळाचे
‘महाधम्मरक्खिता’ पुरस्कार जाहीर
देवगड, ता. १३ ः ल. रा. जाधव गुरुजी स्मृती प्रित्यर्थ त्यांचा परिवार व किनळे (ता. सावंतवाडी) येथील जयभीम उत्कर्ष मंडळ यांच्यावतीने देण्यात येणारे ‘महाधम्मरक्खिता’ पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. प्रा. बी. पी. कांबळी, आर. जी. चौकेकर व दिवंगत विष्णू आसोलकर यांना यावर्षी ‘महाधम्मरक्खिता’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. येत्या बुद्धजयंतीला किनळे येथे पुरस्कार वितरण करण्यात येणार असल्याची माहिती सचिन जाधव यांनी माध्यमांना दिली.
या पुरस्कारांची घोषणा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी केली जाते. बुद्धजयंतीला पुरस्कार वितरण करण्यात येते. सम्राट अशोकाने धम्म प्रचार, प्रसार करणाऱ्यासाठी राज्यात पाठविलेल्या ‘महाधम्मरक्खिता’ या धम्म दुताच्या नावे हा पुरस्कार देण्यात येतो. पुरस्कार जाहीर झालेले दिवंगत विष्णू आसोलकर यांचे धम्म चळवळीतील योगदानासाठी त्यांना मरणोत्तर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तसेच प्रा. कांबळी व श्री. चौकेकर यांनी अविरत धम्म प्रचार प्रसाराचे कार्य केले असल्याने यासाठी हा पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात येणार आहे. शाल, सन्मानपत्र व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे. जिल्ह्यात बौद्ध धम्म प्रचार, प्रसार करणार्‍या व्यक्ती तसेच शंभर टक्के बौद्धवाडी वस्तीला सन्मानित करण्यात येणार आहे. ल. रा. जाधव गुरुजी यांच्या मुळ गावी किनळे येथे मे महिन्यात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा आयोजित करण्यात येणार असल्याचे सचिन जाधव यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com