
लांजात इफ्तार पार्टीला प्रतिसाद
-rat१३p३६.jpg ः
९५६०१
लांजा ः शहरातील सय्यद चाँदशहा बुखारी दर्गा लांजा येथे इफ्तार पार्टीप्रसंगी पोलिस उपनिरीक्षक जाधव यांचे स्वागत करताना मुस्लिम वेल्फेअर सोसायटीचे पदाधिकारी अकील नाईक.
-
लांजात इफ्तार पार्टीला प्रतिसाद
लांजा, ता. १३ ः इफ्तार पार्टीचे आयोजन करून शहरातील हिंदू-मुस्लिम बांधवांचा सलोखा कायम राखण्याचे काम केले गेले असल्याचे गौरवोद्गार तहसीलदार प्रमोद कदम यांनी काढले. मुस्लिम वेल्फेअर सोसायटी लांजा आणि पोलिस ठाणे लांजा यांच्या संयुक्त विद्यमाने लांजा शहरातील सय्यद चाँदशहा बुखारी दर्गा या ठिकाणी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून लांजा तहसीलदार प्रमोद कदम हे बोलत होते. या वेळी पोलिस निरीक्षक दादासाहेब घुटुगडे, उपनिरीक्षक प्रशांत जाधव, मुस्लिम वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष रफिक नाईक, जमातूल मुस्लिम लांजाचे अध्यक्ष शौकत नाईक आदी उपस्थित होते.