देवरूख ः 18 एप्रिलपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा होणार

देवरूख ः 18 एप्रिलपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा होणार

देवरुखात दिवसाआड पाणीपुरवठा
पर्शरामवाडी, धावडेवाडी बंधाऱ्यात मर्यादित साठा
साडवली, ता. १४ ः भारतीय हवामान खात्याने दक्षिण पॅसिफिक महासागरातील ''अल् निनो'' या समुद्र प्रवाहाच्या देशमातून पर्जन्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता वर्तवली आहे. याचेच परिणामस्वरूप म्हणजे उन्हाळ्यात उष्णतेच्या लाटा येण्याची संभावना असून तीव्र उष्णतेमुळे होणारे बाष्पीभवन विचारात घेता बंधाऱ्यातील पाणीसाठा दिवसेंदिवस वेगाने खालावत जाणार असल्याने अपुरे पर्जन्यमान व विलंबाने मान्सूनचे आगमन होण्याची संभाव्यता आहे तसेच अल् निनो प्रभावाच्या धर्तीवर ऑगस्ट २०२३ पर्यंत पुरेल अशाप्रकारे पाणीपुरवठा करण्यासाठी नियोजन तथा उपाययोजना करण्याच्या सूचना शासनस्तरावरून प्राप्त झाल्या आहेत.
देवरूखात केवळ पर्शरामवाडी व धावडेवाडी बंधारा या जलस्रोतावरून पाणीपुरवठा होत आहे. निनोच्या प्रभावाने वाढत्या तापमानामुळे पर्शरामवाडी व धावडेवाडी बंधाऱ्यामधील पाणी प्रचंड कमी होत आहे. सद्यःस्थितीत बंधाऱ्यात केवळ ३० मे पर्यंत पुरेल इतकाच उपयुक्त साठा शिल्लक आहे. अल् निनोच्या प्रभावामुळे मान्सूनचे आगमन विलंबाने झाल्यास व त्यामुळे उपरोक्त पाणीसाठा संपुष्टात आल्यास दुसरा कोणताही जलस्रोत तथा पर्याय उपलब्ध नसल्याने शहरात भीषण पाणीटंचाई उद्धभवू शकते. हे परिणाम लक्षात घेत काटकसरीने व जबाबदारीने पाण्याचा वापर करणे आवश्यक आहे जेणेकरून संभाव्य पाणीटंचाईची झळ नागरिकांना पोहोचू नये.
संभाव्य भीषण पाणीटंचाईवर मात करण्याकामी मान्सूनच्या पावसात पुरेसा पाणीपुरवठा होण्याच्यादृष्टीने १८ एप्रिलपासून शहरात एक दिवस आड पाणीपुरवठा करण्यात येईल. परिस्थिती अजून बिकट झाल्यास ही तयारी असणार आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा कमी वापर करून नगरपंचायतीस सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा अभियंता यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com