आंबेडकर जयंती बांदा
केंद्रशाळेत विविध उपक्रमांनी

आंबेडकर जयंती बांदा केंद्रशाळेत विविध उपक्रमांनी

९५८३३

आंबेडकर जयंतीनिमित्त
बांदा केंद्रशाळेत उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १४ ः भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद बांदा क्रमांक १ केंद्र शाळेत विविध उपक्रम झाले.
यावेळी मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी अमोघ वालावलकर, नैतिक मोरजकर, सर्वज्ञ वराडकर, गौरांग देसाई, अनुराधा केरीकर, यल्लापा करंबळकर, अर्णव सावंत, दुर्वा नाटेकर, स्वामिनी तर्पे, काव्या चव्हाण, हेमांगी दाभोलकर, काव्या पालकर, काव्या सावंत आदी विद्यार्थी तसेच शिक्षकांनी आपल्या भाषणातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. यावेळी विद्यार्थ्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित भीमगीतांचे गायन केले. यावेळी विद्यार्थी धीरज‌ पटेल‌, गौरव घोगळे यांनी बाबासाहेबांच्या तर तनिष्का देसाई हिने रमाईची साकारलेली वेशभूषा लक्षवेधी ठरली. यावेळी विद्यार्थ्यांकडून शाळेच्या वाचनालयातील अवांतर पुस्तकांचे वाचन करून‌ घेण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यार्थी अमोघ वालावलकर हा होता. विद्यार्थिनी ईश्वरी वावळीये व धनश्री शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शाळेतील शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com