महागाईविरोधात लवकरच मोर्चा

महागाईविरोधात लवकरच मोर्चा

96181
वैभववाडी ः येथील कार्यकर्त्यांच्या बैठकीत जिल्हाप्रमुख सतीश सावंत यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आमदार वैभव नाईक, अतुल रावराणे, संदेश पारकर, सुशांत नाईक आदी उपस्थित होते.

महागाईविरोधात लवकरच मोर्चा

सतीश सावंत; वैभववाडीत ठाकरे शिवसेनेच्या बैठकीत इशारा

सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. १५ ः महागाईचे चटके गोरगरीब जनतेला सहन होत नाहीत. काजूला हमीभाव नसल्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. त्यामुळे शासनाला जाग आणण्यासाठी लवकरच ठाकरे शिवसेनेच्यावतीने तालुक्यात मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख सतीश सावंत यांनी येथे दिली.
उध्दव ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्याची बैठक येथील वृंदावन रिसॉर्टवर झाली. या बैठकीला आमदार वैभव नाईक, शिवसेना नेते अतुल रावराणे, युवा नेते संदेश पारकर, सुशांत नाईक, तालुकाप्रमुख मंगेश लोके, दिगंबर पाटील, स्वप्नील धुरी, नलिनी पाटील, दिव्या पाचकुडे, संजय चव्हाण, श्रद्धा रावराणे, सानिका रावराणे, मानसी सावंत आदी उपस्थित होते.
जिल्हाप्रमुख सावंत म्हणाले, "गॅसचे दर वाढले आहेत. खते, बियाण्यांच्या किंमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. काजूला हमीभाव नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. त्यामुळे या प्रश्नाबाबत सरकारला जाग आणणे आवश्यक असल्याने मोर्चा काढण्यात येईल. याशिवाय करुळ घाटरस्ता दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपयांच्या निधी आणल्याचे सांगितले जाते; परंतु प्रत्यक्षात या रस्त्याची अवस्था बिकट आहे. जमीनमालकांना मोबदला न देता धरणांची कामे सुरू आहेत. तर अरुणा प्रकल्पाच्या कालव्यांची कामे निकृष्ट पध्दतीने सुरू आहेत. यासंदर्भात देखील शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे."
ते पुढे म्हणाले, "कार्यकर्त्यांनी एक शिवसैनिक म्हणून नव्या उमेदीने पक्षबांधणीचे काम केले पाहिजे. आपासातील हेवेदावे बाजूला सारून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. संघटितपणे काम केल्यास आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. २० ते २५ एप्रिल या कालावधीत जिल्हा परिषद मतदारसंघ निहाय जनसंपर्क दौरे होणार आहेत. त्यानंतर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात खासदार विनायक राऊत यांचा मतदारसंघ निहाय दौरा निश्चित केला आहे. शहरातील स्टॉलधारक जर उद्धव ठाकरे शिवसेनेच्या पाठीशी निर्भीडपणे उभे राहिले, तर त्यांना देखील न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू."
.............
चौकट
... पण विकले जाऊ नका
सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना सावंत यांनी लढला नाहीस तरी चालेल; पण विकला जाता कामा नये, या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेंडकरांच्या वाक्याची आठवण करून दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com