मालवणात वधू-वर मेळावा

मालवणात वधू-वर मेळावा

96329
मालवण ः क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाच्या वधू-वर मेळाव्याचे उद्‍घाटन करताना साईनाथ चव्हाण.

मालवणात वधू-वर मेळावा
मालवण : क्षात्रकुलोत्पन्न मराठा-गावडे समाजाच्या वायरी येथील वधू-वर सूचक मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शेकडो वधू-वरांसह पालक आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते आप्पा चव्हाण यांनी आयोजित केलेल्या या मेळाव्याचे मान्यवरांनी कौतुक करताना विखुरलेल्या समाजाला आज एकत्र येण्याची हाक दिली. वायरी येथील लोकनेते आर. जी. चव्हाण मंगल कार्यालयात या वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. ज्येष्ठ नेते साईनाथ चव्हाण यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने मेळाव्याचे उदघाटन करण्यात आले. यावेळी अनिल फणसेकर, सूर्यकांत फणसेकर, राजू हंजनकर, देवदत्त साळगावकर (कोचरा), पी. एम. चव्हाण, बाबा मालवणकर (तळवडे), महेश लुडबे, प्रताप चव्हाण (नेमळे), विनय गावकर, शिरोडा उपसरपंच चंदन हाडके, राजन भोजने, समीर मसूरकर, बाबू गावकर, नाईक (सावरवाड) आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी शेकडो वधू-वरांनी आपले बायोडाटा जमा केले. प्रभुदास आजगावकर यांनी सूत्रसंचालन केले. आप्पा लुडबे यांनी आभार मानले.
................
96330
मालवण ः येथे आयोजित महाआरोग्य शिबिरास उपस्थित डॉक्टर वर्ग व मान्यवर.

मालवणात महाआरोग्य शिबिर
मालवण : स्नेहल भगिनी मंडळ व ग्लोबल फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने येथील दैवज्ञ भवन येथे आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. १०० हुन अधिक रुग्णांची यावेळी तपासणी करण्यात आली. स्नेहल भगिनी मंडळाच्या अध्यक्षा अश्विनी कांदळकर, डॉ. अंगाराज माने यांच्या हस्ते शिबिराचे उद्‍घाटन करण्यात आले. यावेळी सचिव विद्या मोरे, खजिनदार लतिका नेरुरकर, अन्य महिला सदस्या, ग्लोबल फाउंडेशनचे गुरू देसाई, उमेश गावडे आदी उपस्थित होते. शिबिरात नेत्रचिकित्सा, रक्त तपासणीसह अन्य आजारांच्या रुग्णांची डॉ. पायल माने, डॉ. बापूसो, डॉ. प्रमोद, डॉ. शुभम, डॉ. प्रणव प्रभू, मिनरवास परब, पूजा चव्हाण यांनी तपासणी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com