महामानवाची जयंती घराघरांत साजरी व्हावी

महामानवाची जयंती घराघरांत साजरी व्हावी

96393
किर्लोस ः येथे आयोजित कार्यक्रमात भंडारी हायस्कूलचे मुख्याध्यापक व्ही. जी. खोत यांचा सत्कार करण्यात आला.

महामानवाची जयंती घराघरांत साजरी व्हावी

सुजित जाधव; किर्लोसमध्ये चर्मकार मंडळाकडून अभिवादन

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १६ : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती समाजातील प्रत्येक घराघरांमध्ये दिवाळीप्रमाणे साजरी व्हावी, असे प्रतिपादन जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुजित जाधव यांनी किर्लोस येथे केले.
चर्मकार समाज उन्नती मंडळ, मालवण शाखेच्या वतीने किर्लोस येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची संयुक्त जयंती संत रविदास प्रतिष्ठान, चव्हाणवाडी-किर्लोस येथे उत्साहात साजरी करण्यात आली. तालुकाध्यक्ष हरेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला. यावेळी जिल्हाध्यक्ष जाधव, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर माणगावकर, जिल्हा सरचिटणीस चंद्रसेन पाताडे, सरपंच साक्षी चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य गुरुनाथ चव्हाण, तालुका सरचिटणीस संभाजी कोरे, प्रमुख मार्गदर्शक भंडारी हायस्कूलचे मुख्याध्यापक व्ही. जी. खोत, उपाध्यक्ष नीलेश पवार, संतोष हिवाळेकर, मुरारी जांभळे, विजय पाताडे, श्याम चव्हाण, मंगेश चव्हाण, शामल चव्हाण, कांचन नांदोसकर, सल्लागार वसंत चव्हाण, श्रीकृष्ण पाडगावकर, बाळकृष्ण माणगावकर, बाळकृष्ण नांदोस्कर, प्रकाश चव्हाण, किर्लोस प्रभाग अध्यक्ष उदयसिंग चव्हाण, अर्जुन चव्हाण, सचिन चव्हाण, संदेश चव्हाण, मेघना चव्हाण आदी उपस्थित होते.
---
सभागृहासाठी २५ लाख देणार
जिल्हाध्यक्ष जाधव यांनी किर्लोस चर्मकार समाजाने उभारलेल्या समाजमंदिर सभागृहाचे उर्वरित काम करण्यासाठी आमदार वैभव नाईक यांच्या फंडातून २५ लाखाचा निधी देण्याचे आश्वासन दिले. मालवण तालुक्याने कार्यक्रमाचे चांगले आयोजन केले असून यातून समाजबांधवांना एकत्र आणण्याचे कार्य केले आहे. या कार्यात सर्व सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
--
वास्तवाचा अभ्यास करा
मुख्याध्यापक खोत यांनी डॉ. बाबासाहेबांचा जीवन प्रवास विशद केला. डॉ. बाबासाहेबांनी गरिबीतून शिक्षण पूर्ण करत अनेक डिग्री प्राप्त केल्या, हे नवीन पिढीने जाणून घेतले पाहिजे. ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हेच बीद्र बाबासाहेबांचे होते. महिलांनी लढायला शिकले पाहिजे. आजच्या मुलांनी सोशल मीडियातून बाहेर पडून वास्तवाचा अभ्यास करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com