रोपवाटिकेची पहाणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रोपवाटिकेची पहाणी
रोपवाटिकेची पहाणी

रोपवाटिकेची पहाणी

sakal_logo
By

बातमी क्र. ३९ (संक्षिप्त, ५ साठी)

- rat१६p३१.jpg-
९६३५८
रत्नागिरी ः हातखंबा फळ रोपवाटिका केंद्राची पाहणी करताना महासंचालक अंकुश माने. सोबत जिल्हा कृषी अध्यक्ष श्रीमती सुनंदा कुराडे व इतर.

कृषी सहसंचालक मानेंनी
केली फळ रोपवाटिकेची पाहणी

पावस ः तालुका फळ रोपवाटिका हातखंबा (झरेवाडी ) येथे कोकण कृषी विभागाचे सहसंचालक अंकुश माने यांनी भेट देत तेथील रोपवाटिकेची पाहणी केली. खरीप हंगाम लक्षात घेऊन कोकण कृषी विभागाची सहसंचालक माने यांचे कोकण विभागात दौरे आणि आढावा बैठक होत आहेत. यामध्ये शेतकऱ्यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शंभर टक्के अनुदानावर फळबाग लागवड करावी असे आवाहन त्यांनी केले. शेतकऱ्यांना रोपवाटिकेतून रोपांचा तुटवडा भासू नये यासाठी श्री. माने यांचे प्रयत्न चालू आहेत. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा कृषी अधीक्षक श्रीमती सुनंदा कुऱ्हाडे आणि इतर कृषी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते
-

फोटो ओळी
- rat१६p३२.jpg-
९६३५९
संगमेश्वर ः तालुक्यातील डीगणी गावामध्ये शिव सह्याद्री सहकारी दूध उत्पादक संघाच्या फलकाचे अनावरण करताना शिवसेना जिल्हा सह संपर्कप्रमुख श्री राजेंद्र महाडिक सोबत इतर मान्यवर

दूध संघाच्या माध्यमातून
शेतकऱ्यांची उन्नती ः महाडिक

पावस ः अकरा वर्षांपूर्वी कोल्हापूर वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे यांच्या कारखान्यामध्ये शेतकऱ्यांना नेण्यात आले होते. त्याचे फलित मिळाले असून दूध संघाच्या माध्यमातून शेतकऱ्याला अधिक उन्नतीकडे जाण्यासाठी एक चांगले पाऊल उचलले आहे, असे शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक यांनी सांगितले. ते डिंगणी बागवाडी येथील दूध संघाच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन बोलत होते. ते म्हणाले, वारणानगर सहकारी कारखान्यांमध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळावे यासाठी सहल काढली होती. त्यांना उद्योगधंद्याच्या दृष्टीने चालना मिळावी, त्या दृष्टीने शेतकऱ्यांच्या सहलीचे आयोजन करण्यात आले होते. त्या माध्यमातून तात्यासाहेब कोरे यांचे स्वप्न सत्यात उतरण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात आले. परंतु त्याला यश आले नाही. आता या दूध उत्पादक संघाच्या माध्यमातून चालना मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. शिव सह्याद्री सहकारी दूध उत्पादक संघ याचे उद्घाटन राजेंद्र महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रचना महाडिक, शिवसेना खाडी विभाग प्रमुख महेश देसाई, दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष सुदर्शन मोहिते, सचिव विलास मिरगल, कोषाध्यक्ष मनोज काजरेकर, प्रबंधक जितेंद्र नितोरे आणि दूध उत्पादक संघाचे पदाधिकारी सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.