
संक्षिप्त
पान 5 साठी, संक्षिप्त)
आंबेडकर जयंतीला बुरंबीत आरोग्य शिबिर
संगमेश्वर : प्राथमिक आरोग्य केंद्र बुरंबी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. तसेच आरोग्यवर्धिनी दिनानिमित्त शिबिर घेण्यात आले व थायरॉईड व कोलेस्टेरॉलसाठी रक्त तपासणी शिबिर घेण्यात आले. ️वैद्यकीय अधिकारी डॉ. रायभोळे, सुपरवायझर सौ. नाईक, श्री. गुरव, श्री. शिंदे, आरोग्य सेविका सौ. देवस्थळी, आरोग्य सेवक श्री. बिबे व नितीन पारधी, या सर्वानी शिबिराचे उत्तम नियोजन केले.
96398
देवरुखात नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र
साडवली ः येथे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना नागरी आरोग्यवर्धिनी केंद्राचे नगराध्यक्ष मृणाल शेटे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या नागरी केंद्रात एक वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस), एक नर्स व आरोग्य सेवक यांच्यामार्फत गर्भवती माता तपासणी, नियमित लसीकरण, असंसर्गजन्य रोग नियंत्रण आजार इत्यादी सेवा या बाह्यरुग्ण विभागामार्फत दिल्या जाणार आहेत. वैद्यकीय अधीक्षक डॉ. संदीप माने, तालुका आरोग्य अधिकारी डॅा. सोनवणे उपस्थित होते.
उपकेंद्र कोसुंब येथे आरोग्य शिबिर
देवरूख ः आरोग्यवर्धिनी दिनानिमित्त उपकेंद्र कोसुंब येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयडी, कोलेस्ट्रोल, एचबी, थायरॉईड, रक्ततपासण्या करण्यात आल्या. आरोग्य अधिकारी ऋतुजा शिंदे, आशा ब्रीद, जोशी मॅडम, लॅब टेक्निशियन अनुष्का मोरे यांच्या मोलाच्या सहकार्याने आणि ग्रामस्थांच्या उदंड प्रतिसादामुळे हे शिबिर चांगल्याप्रकारे झाले.