विकासकामांमुळे पारपोलीवासीय आनंदी

विकासकामांमुळे पारपोलीवासीय आनंदी

96540
पारपोली : रस्त्याच्या कामाचा प्रारंभ करताना जिल्हाप्रमुख अशोक दळवी. बाजूला तालुकाप्रमुख बबन राणे आदी.

विकासकामांमुळे पारपोलीवासीय आनंदी

केसरकरांमुळे निधी; मुख्य रस्त्याच्या डागडुजीला प्रारंभ


सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १७ ः पारपोली (ता.सावंतवाडी) ग्रामस्थांच्या मागणीनुसार शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या पारपोली मुख्य रस्ता मजबुतीकरणाच्या कामाचा प्रारंभ शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख नारायण ऊर्फ बबन राणे, उपसरपंच संदेश गुरव, गजानन नाटेकर, एकनाथ हळदणकर तसेच सरपंच कृष्णा नाईक, ग्रामपंचायत सदस्य गौरेश तेजम, ऋतुजा परब, विलासिनी गावकर, नूतन परब, उदय जाधव, ग्रामस्थ एकनाथ परब, प्रभाकर गावकर, लवू बिर्जे, सोनू गावकर, रामकृष्ण गावकर, चंद्रकांत गावकर, शंकर परब, नारायण गुरव, शिवराम गुरव, बाबाजी गुरव, संतोष राणे, अनिल राणे, मोहन परब, रमेश परब, प्रीतेश कलांगण, परेश कलांगण, सुरेश नाईक, दत्ताराम नाईक, शंकर नाईक, अंकुश नाईक, सतीश गुरव, हरिश्चंद्र आईर, भास्कर सावंत, सचिन (सोमा) परब, हर्ष गावकर, गंगाराम गुरव, अर्जुन गुरव, तातोबा जाधव, मोहन जाधव, केशव जाधव, दशरथ तेजम, गजानन डांगी, वसंत गुरव, सूर्यकांत तेजम, वामन राऊळ, दीपेश गावकर, बाबाजी गुरव, सदानंद कलांगण, श्रीपर गावकर, परशुराम परब आदी उपस्थित होते. पारपोली गावामध्ये अनेक विकासकामांसाठी शालेय शिक्षणमंत्री केसरकर तसेच पारपोली ग्रामविकास मंडळ, मुंबई आणि युवा नेतृत्व संदेश गुरव यांनी वेळोवेळी सहकार्य केल्याने पारपोली गावाच्या विकासाच्या दृष्टीने प्रगती झाल्याने ग्रामस्थांनी संबंधितांचे आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com