लांजा-राज्यस्तरीय मंथन परीक्षेत

लांजा-राज्यस्तरीय मंथन परीक्षेत

-rat१७p२०.jpg-
९६५५८
अमोघ भरणकर
-rat१७p२१.jpg-
९६५५९
साई कशेळकर
-rat१७p२२.jpg-
९६५६०
वेदांत बने
-rat१७p२३.jpg-
९६५६१
अन्वी मोहिते
-----------

राज्यस्तरीय मंथन परीक्षेत
बेनीबुद्रूक शाळेचे यश

लांजा, ता. १७ ः राज्यस्तरीय मंथन परीक्षेची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली असून या परीक्षेत बेनी बुद्रुक-गुरववाडी शाळा नं. ४ ने घवघवीत यश प्राप्त केले आहे. या शाळेतील चार विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले असून १०० टक्के निकालाची परंपरा शाळेने कायम राखली आहे. राज्यस्तरीय मंथन प्रज्ञाशोध परीक्षेच्या गुणवत्ता यादीत वेदांत बनेने (तिसरी) राज्यात २९ वा आणि जिल्ह्यात १४ वा क्रमांक मिळवला. अन्वी मोहितेने (तिसरी) राज्यात ३५ वी, जिल्ह्यात २० वी, साई कशेळकर (तिसरी) राज्यात ३६ वा, जिल्ह्यात २१ वा, अमोघ चंद्रकांत भरणकर (चौथी) राज्यात ४५ वा, जिल्ह्यात २६ वा या विद्यार्थ्यांनी स्थान मिळवले. शिक्षक नितीन मोहिते, अशोक बांगर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. गटशिक्षणाधिकारी विजयकुमार बंडगर, केंद्रप्रमुख मंदार नार्वेकर, सरपंच परेश खानविलकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनय बने, सदस्य, पालक व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com