सर्वाधिक लांबीच्या उड्डाणपुलाच्या कामाला वेग

सर्वाधिक लांबीच्या उड्डाणपुलाच्या कामाला वेग

फोटो ओळी
- ratchl१७१.jpg -KOP२३L९६५३० चिपळूण ः बहादूरशेखनाका येथे उड्डाणपुलावर बसविण्यात येत असलेले गर्डर


सर्वाधिक लांबीच्या उड्डाणपुलाच्या कामाला वेग
गर्डर उभारणीला सुरवातः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चिपळूणातील चौपदरीकरण
चिपळूण, ता. १७ ः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चौपदरीकरणातील सर्वाधिक १.८० किलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलाचे काम वेगाने सुरू आहे. या पुलाच्या ४६ पिलरचे काम पूर्ण झाल्यानंतर ठेकेदार कंपनीने आता ''मिशन गर्डर'' सुरू केले आहे. चाचणी घेतल्यानंतर पुलावर गर्डर बसविण्यास सुरवात झाली आहे. शहरातून जाणाऱ्या महामार्गालगत सर्व्हिस रोडच्या कामानाही गती मिळाली आहे.
चौपदरीकरणाच्या कामाला गती आली आहे. परशुराम ते आरवली दरम्यान काम वेगाने सुरू झाले आहे. अजूनही काही भागात मोऱ्या व गटारे उभारण्याची कामे सुरू आहेत. सुमारे ३६ किलोमीटरच्या अंतरातील हे काम टप्प्या-टप्प्याने केले जात आहे. कापसाळ भागातील कॉंक्रीटीकरणानेही वेग घेतला असून ते पुर्णत्वास जात आहे. त्याशिवाय रखडेलल्या सावर्डे बाजारपेठ परिसरातही कॉंक्रिटीकरणाचे काम पूर्ण होत आले आहे. चिपळूण शहर हद्दीतही उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूचा रस्ता काँक्रीटचा केला जाणार आहे. त्यासाठी एकेरी मार्ग बंद ठेवून काँक्रीटीकरणाचे काम केले जात आहे.
सद्यस्थितीत ठेकेदार कंपनीने सर्वात लांब पल्ल्याच्या उड्डाणपुलाच्या कामावर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. गर्डरच्या कामासाठी अत्यावश्यक असलेली महाकाय यंत्रणा बहादूरशेखनाका दीड महिन्यापूर्वीच दाखल झाली. या यंत्रणेचे जोडकाम पूर्ण झाल्यानंतर गर्डर ची चाचणी घेण्यात आली. त्यानंतर प्रत्यक्षात पुलावर गर्डर बसविण्यास सुरवात झाली आहे. सुमारे ८०० गर्डर या पुलावर बसवले जाणार आहेत. पिलर उभारताना प्रत्येक ठिकाणी खड्डे व काही ठिकाणी भराव करण्यात आला होता. आता गर्डरच्या कामासाठी पिलरच्या आजुबाजूने सपाटीकरण पूर्ण केले. सावर्डे कोडमळा येथे तयार स्थितीत असलेले हे गर्डर येथे आणून क्रेनच्या साहाय्याने बसवले जात आहेत.


चौकट
४६ पिलरचे काम पूर्ण
शहरातील बहादूरशेख नाका ते युनायटेड इंग्लिश स्कूलच्या पुढेपर्यंत हा पूल उभारला जाणार आहे. साधारण या पुलाची लांबी १८४० मीटर, तर रुंदी ४५ मीटर इतकी आहे. या पुलाचे ४६ पिलरचे काम पूर्णत्वास गेले आहे. त्यानंतर आता सर्व्हिस रोडसह गर्डरच्या कामावर लक्ष केंद्रीत केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com