-जिल्ह्यात 7 कोटीची नवीन 5 धान्य गोदामे

-जिल्ह्यात 7 कोटीची नवीन 5 धान्य गोदामे

बातमी क्र. २७ (पान ५ साठी मेन)

जिल्ह्यात ७ कोटीची नवीन पाच धान्य गोदामे

तिप्पट साठवण क्षमता ; पुरवठा विभागाकडून शासनाला प्रस्ताव

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १७ : जिल्ह्यात आहे त्या गोदामांपेक्षा तिप्पट धान्य साठा करता यावा, अशी नवीन गोदामे उभारण्याचा प्रस्ताव जिल्हा पुरवठा विभागाने शासनाला सादर केला आहे. सुमारे सात कोटींच्या या प्रस्तावांमध्ये ३ नवीन धान्य गोदामे तर अन्य दोन ठिकाणी पुर्ण पडलेल्या गोदामांवर नवीन गोदामे उभारण्यात येणार आहेत. यामुळे १० हजार मेट्रीक टन धान्य साठविण्याची गोदामांची क्षमता तिप्पट होणार आहे.
जिल्हा पुरवठा विभागाची जिल्ह्यात १३ धान्य गोदाम आहेत. या तेरा गोदामांमध्ये १० हजार ६६० मेट्रिक टन इतकी धान साठवण क्षमता आहे. परंतु आता या गोदामांपेक्षा धान्य साठविण्याची तिप्पट क्षमता असणारी नवीन पाच गोदामांचा प्रस्ताव जिल्हा पुरवठा विभागाने शासनाला दिला आहे. यामध्ये ३ नवीन धान्य गोडाऊन खेड, गुहागर आणि लांजा येथे होणार असून उर्वरित गोदामे जुन्या पडलेल्या गोदामांवर नवीन बांधण्यात येणार आहेत. अनेक महिन्यांपूर्वी हे प्रस्ताव जिल्हा पुरवठा विभागाकडून शासनाकडे पाठवण्यात आला आहे. मात्र अजून त्यावर निर्णय झालेला नाही.
खेड येते नवीन गोदामाचा प्रस्ताव १ कोटी ५ लाख ८७ हजार ८४५ आहे. गुहागर-मुंडर येथील गोदामाचा प्रस्ताव २ कोटी २७ लाख ३० हजार ५६१, लांजा गोदामाचा १ कोटी ८६ लाख १२ हजार ७८ हे ३ नवीन गोदामांचे प्रस्ताव आहेत. तर राजापूर ९२ लाख २६ हजार, संगमेश्वर ५५ लाख ६२ हजार गोडाऊन दुरुस्ती साठी निधीचा प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी पुरोहित यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com