छंद माणसाला आनंदाने जगायला शिकवतो

छंद माणसाला आनंदाने जगायला शिकवतो

बातमी क्र. ३३ (पान ५ साठी)

-rat१७p२९.jpg-
९६६११
राजापूर ः राजापूर हायस्कूलच्या छंदवर्गाच्या समारोपाप्रसंगी बोलताना मानसी हजेरी.
--
छंद माणसाला आनंदाने जगायला शिकवतो

मानसी हजेरी ; राजापूर हायस्कूलच्या छंद वर्गाचा समारोप

राजापूर, ता. १७ ः जीवन जगत असताना दैनंदिन व्यवहारातून मनाला उत्साहीत करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला एक तरी छंद असला पाहिजे. छंद मनाला आनंद देतात. त्यातून जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो, असे प्रतिपादन राजापूर हायस्कुलच्या माजी मुख्याध्यापिका व प्रशालेच्या समन्वयक मानसी हजेरी यांनी येथे केले.
येथील राजापूर हायस्कूल विदयार्थ्याच्या सर्वांगिण विकासाकरीता नवनवीन उपक्रम राबवत असे असते. याचाच एक भाग म्हणून प्रशालेने परीक्षा संपल्यावर विद्यार्थ्यासाठी छंद वर्गाचे आयोजन केले होते. या वेळी उपमुख्याध्यापक श्री. पोवार आदी उपस्थित होते. या छंद वर्गामध्ये संगीत, आयबीटी, अटल लॅब, क्रीडा, चित्रकला, कागदकाम, ग्लासपेंटींग, रंगकाम या विषयी प्रात्यक्षिकासह माहिती देण्यात आली. या शिवाय या छंद वर्गाला विविध क्रीडा प्रकार, व्यायाम, खेळांचे मुलभूत नियम याविषयी क्रीडाशिक्षक श्री. कुंभार, सौ. दिवटे, श्री. शिवगण यांचे मार्गदर्शन लाभले. संगीत शिक्षक उमाशंकर दाते यांनी शास्त्रीय संगीत, विविध वाद्यांची माहिती दिली. सुलेखन वर्गाला अक्षर मित्रचे बी. के. गोंडाळ, प्रशाळेच्या शिक्षिका श्रीमती दर्शना मांडवकर यांनी मार्गदर्शन केले. प्रणाली कातकर यांनी चित्रकला, ओरोगामी, टाकाक पासून टिकावू याविषयी मार्गदर्शन केले. अटल लॅब या माध्यमातून विविध प्रकारचे रोबोट तयार करण्यात आले. आयबीटी विभागातर्फे विविध पदार्थ, वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. उपक्रमाचे संस्थेचे कार्यवाह प्रकाश भावे, कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षा डॉ. छाया जोशी, उपाध्यक्ष अभय मेळेकर, कार्यवाह जगदीश पवार व संस्था पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com