कुंब्रलमधील शिबिरात
२०० जणांची तपासणी

कुंब्रलमधील शिबिरात २०० जणांची तपासणी

96625
कुंब्रल ः येथे आयोजित आरोग्य शिबिरात मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

कुंब्रलमधील शिबिरात
२०० जणांची तपासणी
सावंतवाडी, ता. १७ ः ध्रुवतारा वेलनेसच्या माध्यमातून कुंब्रल (ता. दोडामार्ग) येथे मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात जवळपास दोनशे रुग्णांची तपासणी करण्यात आली. स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मनीष, नाक, घसा शल्यचिकित्सक डॉ. प्रीती, आहार सल्लागार वैदही, जनरल रुग्ण तपासणीसाठी डॉ. गौरी, डॉ. विधी, डॉ. सुखदा व डॉ. दिव्यता, अशी टीम मुंबईहून गावकरी मंडळींना तपासण्यासाठी सहभागी झाली.
शिबिरात मोफत औषध वाटप व अत्यल्प दरात चष्मा वाटप करण्यात आले गावात मूलभूत आरोग्य सुविधा उपलब्ध नसल्याने ध्रुवतारा वेलनेसच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात आला, असे संस्थेचे संस्थापक योगी साकोरे यांनी नमूद केले. डॉक्टरांव्यतिरिक्त ध्रुवताराचे ३१ स्वयंसेवक यात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येऊन सहभागी झाले. या कार्यक्रमाला कुंब्रल ग्रामपंचायतीने स्थानिक पातळीवर मदत केल्याने त्यांचे व ग्रामस्थांचे साकोरे यांनी संस्थेतर्फे आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com