देवगडमध्ये रंगला मिसळ महोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवगडमध्ये रंगला मिसळ महोत्सव
देवगडमध्ये रंगला मिसळ महोत्सव

देवगडमध्ये रंगला मिसळ महोत्सव

sakal_logo
By

96685
देवगड ः गायिका तृप्ती कुडाळकर यांच्या गाण्यावर अक्षरा जयवंत गोसावी या छोट्या मुलीने मनसोक्त नृत्य केले. निवेदक जयवंत भालेकर यांनी तिला प्रोत्साहित केले.

देवगडमध्ये रंगला मिसळ महोत्सव
देवगड, ता. १६ ः येथील देवगड-जामसंडे शहर भाजपतर्फे आयोजित मिसळ महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गायक अभिजीत कोसंबी व गायिका तृप्ती कुडाळकर यांच्या संगीत रजनीलाही प्रेक्षकांनी दाद दिली. यावेळी त्यांच्या गाण्यावर छोट्या मुलांनी मनसोक्त नृत्य केले. दरम्यान, आज दिवसभर मिसळचा खवयांनी आस्वाद घेतला.
रविवारी (ता.१६) सकाळी आमदार नीतेश राणे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्‍घाटन झाले. तर सायंकाळी गायक अभिजीत कोसंबी आणि गायिका तृप्ती कुडाळकर यांचा गीतांचा बहारदार कार्यक्रम झाला. यावेळी अक्षरा जयवंत गोसावी या छोट्या मुलीसह अन्य छोट्या मुलांनी बहारदार नृत्य करून उपस्थितांकडून दाद मिळवली. यावेळी आमदार नीतेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार, माजी आमदार अ‍ॅड. अजित गोगटे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी आदी उपस्थित होते. जयवंत भालेकर आणि परी तेलंग यांनी निवेदन केले.