तळेरे विद्यालय परिसरात पक्ष्यांसाठी ''दानापाणी''

तळेरे विद्यालय परिसरात पक्ष्यांसाठी ''दानापाणी''

swt1812.jpg
96815
तळेरेः वामनराव महाडीक माध्यमिक विद्यालय परिसरात विद्यार्थ्यांनी झाडांवर पक्ष्यांसाठी दानापाण्याची सोय करून आत्मीयता जोपासली. (छायाचित्र : एन. पावसकर)

तळेरे विद्यालय परिसरात पक्ष्यांसाठी ''दानापाणी''
विद्यार्थ्यांनी जपली बांधिलकी ः निसर्गमित्र परिवार, शिक्षकांचाही सहभाग
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. 18 : ऐन उन्हाळ्यात पक्षांचे पाण्याअभावी होणारी गैरसोय लक्षात घेऊन येथील वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालयाच्या परिसरात विद्यार्थ्यांनी झाडांवर जागोजागी करवंट्यामध्ये पाणी आणि खाद्याची सोय उपलब्ध केली आहे. महाडिक माध्यमिक विद्यालय आणि निसर्ग मित्रपरिवाराच्या सहकार्याने हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला असून त्यामुळे पक्ष्यांची दाना-पाण्याची सोय झाली आहे.
विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाविषयी आवड निर्माण व्हावी, प्राणी, पक्ष्यांची गरज ओळखून त्यांच्यासाठी खाद्य व पाणी उपलब्ध करण्याची कृती प्रत्यक्षात उतरविण्यासाठी मुख्याध्यापक अविनाश मांजरेकर यांनी विद्यार्थी, सहकारी शिक्षक आणि निसर्ग मित्र परिवाराच्या सहकार्याने हा उपक्रम हाती घेतला. विद्यार्थ्यांनी नारळाच्या करवंट्या जमा करून त्या झाडांच्या फांद्यांना जागोजागी बांधल्या आणि त्यामध्ये पाणी व खाद्य भरून ठेवले. कडक उन्हाळ्यात पक्ष्यांना त्याचा लाभ व्हावा, हा यामागे उद्देश आहे. संपूर्ण उन्हाळ्यात हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. ही संकल्पना विद्यार्थ्यांनी आपल्या घराशेजारील झाडांवर देखील राबवावी, असे आवाहन मुख्याध्यापक मांजरेकर यांनी व्यक्त केले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना निसर्ग आणि पशुपक्ष्यांबाबत आवड निर्माण होण्यास मदत होईल. निसर्गाचे रक्षक होऊन ते त्याच्या संवर्धनासाठी पुढाकार घेतील, असा विश्वास यावेळी निसर्गमित्र परिवाराचे अध्यक्ष संजय खानविलकर व्यक्त केला. निसर्गमित्र परिवारातर्फे सर्वांच्या सहकार्यातून विद्यालयामध्ये विविध निसर्ग विषयक उपक्रम राबविण्यात येतील, त्याची सुरुवात पक्ष्यांना दानापाणी देण्याच्या उपक्रमापासून करण्यात आली, असे सचिव राजेश जाधव यांनी सांगितले.
या उपक्रमाच्या प्रारंभ प्रसंगी निसर्ग मित्र परिसराचे अध्यक्ष संजय खानविलकर, सचिव राजेश जाधव, कार्यकारिणी सदस्य युवा चित्रकार अक्षय मेस्त्री, सतीश मदभावे, विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक काटे, धनलक्ष्मी तळेकर, आशा काणकेकर, काणेकर यांच्यासह इतर सहकारी शिक्षक, शालेय विद्यार्थी उपस्थित होते. सहायक शिक्षक सी. व्ही. काटे यांनी आभार मानले.
...................

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com