सावंतवाडी शाळा क्रमांक ६ च्या विद्यार्थ्यांचे विविध स्पर्धांत यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावंतवाडी शाळा क्रमांक ६ च्या
विद्यार्थ्यांचे विविध स्पर्धांत यश
सावंतवाडी शाळा क्रमांक ६ च्या विद्यार्थ्यांचे विविध स्पर्धांत यश

सावंतवाडी शाळा क्रमांक ६ च्या विद्यार्थ्यांचे विविध स्पर्धांत यश

sakal_logo
By

96761
सावंतवाडी ः विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळविलेल्या विद्यार्थांचा गौरव करताना मान्यवर.

सावंतवाडी शाळा क्रमांक ६ च्या
विद्यार्थ्यांचे विविध स्पर्धांत यश
सावंतवाडी ः (कै.) श्रीमती लक्ष्मीबाई मुरारी माधव विद्यालय जिल्हा परिषद शाळा भटवाडी सावंतवाडी क्रमांक ६ या शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवले. यामध्ये सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत तिसरीचा विद्यार्थी प्रथमेश लांबर हा १७८ गुण मिळवून जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत ९ वा येऊन तालुक्यात दुसरा आला व सुवर्ण पदक पटकावले. चौथीमधून देवेश जाधव हा १४६ गुण मिळवून सिल्वर मेडल मिळविले. दुसरीमधून वैष्णवी खोचरे व शिवराज साळुंखे हे विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. त्याचप्रमाणे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम शिष्यवृत्ती परीक्षेत चौथीमधून देवेश जाधव २०६ गुण तर सावली पटेल ही विद्यार्थ्यांनी १३८ गुण मिळवून उत्तीर्ण झाली. चैताली पास्ते हिला ११४ गुण मिळाले. यशस्वी विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका व मुख्याध्यापक श्रीमती सायली लांबर, श्रीमती गीता सुतार यांचे मार्गदर्शन लाभले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीमती अनिशा राणे, माजी नगरसेविका दिपाली भालेकर, शिक्षणतज्ज्ञ दिलीप भालेकर तसेच सावंतवाडी केंद्र केंद्रप्रमुख स्नेहा लंगवे, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष श्रीमती समिक्षा खोचरे, बालवाडी ताई सौ. गावडे आदींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
-------------
96762
पार्थ धुरी

‘बीडीएस’मध्ये पार्थ धुरीचे यश
कुडाळ ः माणगाव या गावातील इंग्लिश मीडियम स्कूल बेनगाव, माणगाव या प्रशालेतील चौथीतील विद्यार्थी पार्थ धुरी याने ब्रेन डेव्हलपमेंट शिष्यवृत्ती परीक्षेत २०० पैकी १७० गुण मिळवून राष्ट्रीय स्तरावरील गुणवत्ता यादीत ४७ वा क्रमांक पटकावला. या परीक्षेत जिल्ह्यात त्याचा प्रथम क्रमांक आला तसेच या विद्यार्थ्याने सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत २०० पैकी १६६ गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादी सहावा क्रमांक प्राप्त केला. दोन्ही परीक्षेत सुवर्णपदक प्राप्त करून दुहेरी यश संपादन केले. पार्थ याला प्रशालेतील शिक्षक व त्याचे आई-वडील यांच्याकडून मार्गदर्शन मिळाले.