-गोळप दाभिळवाडी रस्त्याची दुरवस्था

-गोळप दाभिळवाडी रस्त्याची दुरवस्था

७ (टुडे पान २ साठी)

गोळप-दाभिळवाडी रस्त्याची दुरवस्था

ग्रामस्थ आक्रमक ; रास्ता रोकोचा इशारा

पावस, ता. १८ ः रत्नागिरी तालुक्यातील गोळप धर्मशाळा क्र. १ मार्गे दाभिळवाडी, पंचशिलनगर ते गोळप- पावस बायपासपर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यासंदर्भात आश्वासन देऊनही दुरुस्ती ३० एप्रिलपर्यंत न झाल्यास ग्रामस्थांच्या वतीने आंदोलनाचा इशारा गोळप दक्षिणोत्तर पूर्व विभाग विकास महासंघाच्या वतीने देण्यात आला आहे.
रस्त्याच्या दुरवस्थेमुळे या रस्त्यावरून रत्नागिरी किंवा पावसकडे वाहनाने ये-जा करणाऱ्या परिसरातील १४ वाड्यातील व अन्य भागातील वाहनचालक, एसटी प्रवासी, मोटार, दुचाकी, रिक्षा आदी वाहनचालकांना प्रचंड त्रास होत आहे.
गेल्या पाच वर्षापासून दुर्दशा झालेल्या दाभिळवाडी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम मंजूर झाले असून लवकरच ते काम सुरू होणार आहे, असे प्रत्येक निवडणुकीवेळी येथील सर्वसामान्य ग्रामस्थांना सांगितले जाते. प्रत्यक्षात डांबरीकरणाचे काम मंजूर झालेलेच नव्हते असे समजते. त्यामुळे ग्रामस्थांचा संयम संपला असून ग्रामस्थांनी आता पाठपुरावा करण्याचे ठरवले आहे. डिसेंबर २०२२- जानेवारी २०२३ मध्ये प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामाला प्रशासकीय मंजूरी मिळाली आहे. मंजूर झालेले दाभिळवाडी रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम ३० एप्रिलपर्यंत पूर्ण झाले नाही तर त्यानंतर परिसरातील जनतेच्या वतीने कोणत्याही दिवशी व कोणत्याही क्षणी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर, रत्नागिरी-पावस रोडवरील कोळंबे फाटा, गोळप येथे तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महासंघातर्फे बी. के. पालकर, रमेश बाबल्या नारकर, केशव पालकर, संतोष मेस्त्री, सुरेश आग्रे, महादेव पालकर आदींनी दिला आहे.
-

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com