दापोलीत 30 ला समर सायक्लोथॉन

दापोलीत 30 ला समर सायक्लोथॉन

३० (पान २ साठी)

दापोलीत ३० ला समर सायक्लोथॉन

दाभोळ, ता. १८ ः सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे रविवारी (ता. ३०) सकाळी दापोली समर सायक्लोथॉन २०२३ सिझन ३ स्पर्धेचे आयोजन आझाद मैदान दापोली येथे करण्यात आले आहे. यासाठी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून तसेच इतर राज्यातून अनेक नावाजलेले सायकलस्वार आपल्या कुटुंबासह दापोलीत येणार आहेत.
ही स्पर्धा १ ते ६० किमी असून शॉर्ट सिटी लूप ६० किमी, कोस्टल सिनिक रूट ३० किमी, २१ किमी सायकल रेस खुला गट, महिला गट, MTB, सिंगल गिअर अशा गटात होणार आहे. सायकल रेस खुला गट बक्षिसे ११ हजार १११, ७ हजार ७७७, ५ हजार ५५५, ३ हजार ३३३, १ हजार १११ रुपये व चषक आणि महिला गट, MTB, सिंगल गिअरसाठी प्रत्येकी ५ हजार, ३ हजार, १ हजार व चषक अशी बक्षिसे असतील. प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येईल. शिवाय ५०+ लकी ड्रॉ बक्षिसे पण असतील. ६० किमी सायक्लोथॉन मार्ग आझाद मैदान दापोली ते हर्णै, आंजर्ले, आडे उटंबर दापोली असा असेल. १ व २ किमीची फन राईड विनामूल्य असेल. नोंदणीसाठी https://forms.gle/oHf८R५Rk१ZJbwQ७v६ या लिंकचा वापर करू शकता. ऑफलाईन नोंदणी सुनील ऑटोमोबाईल, विनी इलेक्ट्रिकल फॅमिली माळ, श्री सायकल मार्ट, जोशी ब्रदर्स मेडिकल बाजारपेठ, रसिक मोटर्स आझाद मैदान या ठिकाणी करावी. अधिक माहितीसाठी अंबरीश गुरव, केतन पालवणकर, सूरज शेठ यांच्याशी संपर्क साधावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com