क्राईम

क्राईम

दारू विकणाऱ्यावर गुन्हा दाखल
पावस ः गोठणेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर आंबा कलमाच्या बागेत हातभट्टीची दारू विकणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १७ एप्रिलला पावणेसातच्या सुमारास एक ३४ वर्षीय युवक हातभट्टीची दारू विकत असल्याचे लक्षात येताच पूर्णगड पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन धाड टाकली. त्या वेळी त्या तरुणाकडे ४७५ रुपयांची आठ लिटर हातभट्टीची दारू सापडून आली. त्याच्याविरुद्ध दारूबंदी कायदा कलम ६५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


शेल्डीत मारामारी, ८ जणांवर गुन्हा
खेड ः तालुक्यातील शेल्डी-बौद्धवाडी येथे झालेल्या मारहाणप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. त्यानुसार ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. शेल्डी-बौद्धवाडी येथील एका गटातील फिर्यादी नातेवाइकांसमवेत घरी आले असता संशयित १ ते ५ जणांनी कोणतेही कारण नसताना विनापरवाना घरात घुसून शिवीगाळ करत मुलगा, सून व मेहुण्यासह पत्नीसही मारहाण करून दुखापत केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार ५ जणांवर गुन्हा दाखल केला. दुसऱ्या गटातील फिर्यादी घरी नसताना पाळलेला कुत्रा मोठ्याने भुंकला म्हणून संशयित १ ते ३ जणांनी घरात बेकायदेशीर प्रवेश करत मारहाण करत शिवीगाळ केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.


धामणीत आढळला वृद्धाचा मृतदेह
खेड ः तालुक्यातील धामणी-बौद्धवाडी येथील एसटी स्टॉपजवळील पुलालगत ७० वर्षीय वृद्धाचा मृतदेह आढळला. याबाबत पोलिस ठाण्यात कळवल्यानंतर घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. बेशुद्धावस्थेतील अज्ञात वृद्धास उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले. या प्रकरणी येथील पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com