आरटीओतर्फे साडेतेरा कोटींची वसुली

आरटीओतर्फे साडेतेरा कोटींची वसुली

आरटीओतर्फे साडेतेरा कोटींची वसुली
नंदकुमार काळेः महसूल उत्पन्नात ३२ टक्क्यांनी वाढ
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १९ः उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या महसूल वसुलीमध्ये यावर्षी १३.५६ कोटीची वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०२१-२०२२ च्या तुलनेत ३२ टक्केंनी ही वाढ झाली असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकुमार काळे यांनी दिली. वाहन नोंदणीमध्ये दुचाकी २४००, चारचाकी २१२ तर परिवहन संवर्गात ५२५ ची वाढ झाल्याचेही त्यांनी सांगितले.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील विविध वसुलीच्या माध्यमातून सुमारे ५६ कोटी ५२ लाख उत्पन्न मिळाले. यामध्ये मोटार सायकल नवीन नोंदणी-१० कोटी ७५ लाख, कार नवीन नोंदणी १९ कोटी ८५ लाख, परिवहन संवर्गातील नवीन वाहने १ कोटी ५५ लाख, जुना कर-३ कोटी ६७ लाख, परिवहन वाहनांचा कर ६ कोटी ९ लाख, पर्यावरण कर १ कोटी १७ लाख, रस्ता सुरक्षा सेस ६८ लाख, शुल्क ८ कोटी ८९ लाख, तडजोड शुल्क (दंड) २ कोटी ८६ लाख, प्रवासी कर १ कोटी १ लाख अस एकूण ५६ कोटी ५२ लाख महसूल वसुली झाली आहे.
नवीन वाहन नोंदणी कामकाजाचा आढावा घेण्यात आला असून एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ कालावधीत जिल्ह्यात दुचाकी १० हजार ६४७, चारचाकी १ हजार ८४४ परिवहन १ हजार ५९० अशा एकूण १४ हजार ८१ नवीन वाहनांची नोंद झाली आहे. गत आर्थिक वर्ष २०२१ -२०२२ च्या तुलनेत दुचाकी वाहन नोंदणीमध्ये २ हजार ४००, चारचाकी २१२ व परिवहन संवर्गातील वाहनामध्ये ५२५ ची वाढ झाली आहे.
वायुवेग पथकाने वार्षिक लक्षांक (तडजोड शुल्क) १ कोटी २५ लाख असून वार्षिक पूर्तता १ कोटी ३० लाख इतकी केली आहे. याचे प्रमाण १०४ टक्के आहे गत वर्षीच्या तुलनेत ३९.९७ टक्के इतकी वाढ आहे. सीमा तपासणी नाक्यांवरील कामगिरीमध्ये वार्षिक लक्षांक २ कोटी इतका होता त्याची वार्षिक पूर्तता १०० टक्के करण्यात आली तर तडजोड शुल्क वार्षिक पूर्तता सुमारे १ कोटी ९४ इतकी होती तर बाहेरील राज्यातून येणाऱ्या वाहनावरील कर १ कोटी ४० लाख असा एकूण ३ कोटी ३५ लाख ९ हजार इतका जमा झाला असल्याचे श्री. काळे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com