दोन अल्पवयीन मुलांना दिले वडिलांच्या ताब्यात

दोन अल्पवयीन मुलांना दिले वडिलांच्या ताब्यात

अल्पवयीन मुलांना दिले वडिलांच्या ताब्यात

राजापुरातील कथा ; दामिनी पथकाची कामगिरी


राजापूर, ता. १८ ः राजापूर एसटी डेपोसमोर एका बाजूला भेदरलेल्या अवस्थेत सापडलेल्या दोघा अल्पवयीन भावंडांना दामिनी पथकातील पोलिसांनी ताब्यात घेऊन व त्यानंतर त्यांचे मन परिवर्तन करून त्यांना त्यांच्या वडिलांच्या ताब्यात देण्यात आले.

लांजा तालुक्यातील एका गावातील दोन अल्पवयिन मुले सोमवारी (ता. १७) संध्याकाळी एसटी डेपोसमोर एका बाजूस भेदरलेल्या स्थितीत बसलेली आढळून आली. त्यांना दामिनी पथकातील पोलिस कॉन्स्टेबल चव्हाण व स्वामी यांनी विचारणा केली असता त्यांनी आपली आई चार वर्षांपूर्वी घर सोडून गेली असून आम्हाला तिची आठवण येत असल्याचे सांगितले. या वेळी मुलांकडे त्यांच्या वडिलांचे नाव विचारले असता मुलांनी त्यांचे नाव सांगितले. त्यानंतर दामिनी पथकामार्फत त्या मुलांच्या वडिलांशी फोनवर संपर्क करून पोलिस ठाण्यामध्ये बोलावून घेण्यात आले. त्यानंतर, येथील पोलिस निरीक्षक जनार्दन परबकर यांनी मुलांना त्यांच्या ताब्यात दिले. या वेळी पोलिस उपनिरीक्षक मोबिन शेख हे देखील उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com